अभिनेता शाहरुख खान चित्रीकरणादरम्यान जखमी

उपचारांसाठी अमेरिकेला रवाना, एक महिना विश्रांतीचा सल्ला

अभिनेता शाहरुख खान चित्रीकरणादरम्यान जखमी

मुंबई: प्रतिनिधी

अभिनेता शाहरुख खान चित्रपटातील ॲक्शन सीन चित्रीत करताना जखमी झाला असून तो पुढील उपचारांसाठी अमेरिकेला रवाना झाला आहे. डॉक्टरांनी त्याला किमान एक महिना विश्रांतीचा सल्ला दिला. 

किंग या आगामी चित्रपटाचे गोल्डन टोबॅको स्टुडिओ या ठिकाणी एका ॲक्शन सीनचे चित्रीकरण सुरू असताना शाहरुख खान याच्या स्नायूंवर अतिरिक्त ताण पडून तो जखमी झाला. 

पुढील उपचारांसाठी तो अमेरिकेला रवाना झाला आहे. डॉक्टरांनी त्याला उपचारांबरोबरच महिनाभर विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तो पूर्ण बरा होईपर्यंत त्याच्या चित्रपटांचे चित्रीकरण खोळंबणार आहे. 

हे पण वाचा  'देशात व राज्यामध्ये ई - नोटरी  सुरू करण्यात यावी'

Tags:

About The Author

Related Posts

Advertisement

Latest News

Advt