'भारत आणि चीन संबंधात तिसऱ्याची मध्यस्थी नको'

चीन परराष्ट्र मंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेत जयशंकर यांनी सुनावले

'भारत आणि चीन संबंधात तिसऱ्याची मध्यस्थी नको'

बीजिंग: वृत्तसंस्था 

भारत आणि चीन यांच्यातील परस्पर संबंधात कोणत्याही त्रयस्थ देशाची मध्यस्थी नको असल्याचे भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मत्री वांग यी यांच्याशी झालेल्या चर्चेत स्पष्ट केले आहे दोन देशातील संबंधात शांत आणि स्थिर सीमेची भूमिका महत्त्वाची असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले

भारत आणि चीन यांच्यातील सैन्यांमध्ये सण 2020 साली पूर्व लद्धांमध्ये उद्भवलेल्या तणावपूर्ण परिस्थिती नंतर दोन्ही देशातील राजनैतिक पातळीवरील ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. 

जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना त्रयस्थ राष्ट्रा बाबत करून दिलेली जाणीव विशेषतः पाकिस्तानच्या संदर्भात सूचक ठरणारी आहे. सध्या चीनकडून पाकिस्तानला तब्बल 80 टक्क्याहून अधिक लष्करी सामग्री आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला जातो. त्यामध्ये क्षेपणास्त्र, हवाई सुरक्षा यंत्रणा आणि लढाऊ विमानांचा ही समावेश आहे. नुकत्याच भारतीय लष्कराने यशस्वी केलेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान चिनी लष्करी साहित्याची कार्यक्षमता जगासमोर उघडी पडली आहे. 

हे पण वाचा  देशभर शिकवला जाणार छत्रपतींचा जाज्वल्य इतिहास

सागाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन मधील सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सहभागी होण्यासाठी एस जयशंकर यांनी नुकताच चीनचा दोन दिवसांचा दौरा केला. यावेळी चीन आणि भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये द्विपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

चीन आणि भारत यांच्यात ऑक्टोबर 2024 मध्ये झालेल्या करारानंतरडेपसांग आणि डेमचोक परिसरात भारतीय सैन्य निर्वेधपणे गस्त घालू शकत असल्याबद्दल जयशंकर यांनी समाधान व्यक्त केले. पूर्व लडाखमधील तणावाचे वातावरण आणि गलवान खोऱ्यात दोन्ही सैन्यांची झालेली झटापट याला पाच वर्षे पूर्ण झालेली असताना सैन्य माघारीची अट पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे जयशंकर यांनी या बैठकीत नमूद केले. 

भारत आणि चीनमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सैन्य माघारीचा करार झाला असला तरी देखील अद्याप नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांचे 50 हजाराहून अधिक सैन्यदल, रणगाडे आणि चिलखती वाहने यांच्यासह मोठ्या  प्रमाणावर युद्ध सामग्री तैनात आहे. 

द्विपक्षीय वाटाघाटीना चालना देणे हे भारत आणि चीन यांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे उद्दिष्ट होते शांघाय परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीमध्ये एस जयशंकर यांनी प्रामुख्याने दहशतवाद विरोधाचा मुद्दा लावून धरला. 

 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

Advt