'एनडीए ही अजिंक्य योद्धा बाजीराव पेशवे यांच्या स्मारकाची सर्वात योग्य जागा'

अमित शहा यांच्या हस्ते बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

'एनडीए ही अजिंक्य योद्धा बाजीराव पेशवे यांच्या स्मारकाची सर्वात योग्य जागा'

पुणे: प्रतिनिधी 

अजिंक्य  योद्धा थोरले बाजीराव पेशवे यांचे पुतळे देशभरात अनेक ठिकाणी आहेत. मात्र त्यांचे उचित स्मारक उभारण्यासाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी हे सर्वोत्तम ठिकाण आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. 

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या परिसरात उभारण्यात आलेल्या थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले. 

थोरले बाजीराव पेशवे यांना केवळ एकोणिसाव्या वर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी विश्वासाने पेशवे पदाची वस्त्र दिली. त्यांनी स्वराज्याचे रूपांतर साम्राज्यात केले. बाजीराव पेशवे 20 वर्षाच्या कार्यकाळात 41 युद्ध लढले आणि त्या सर्व युद्धांमध्ये विजय प्राप्त केला. असा इतिहास अन्य कोणाही सेनानीचा असेल असे वाटत नाही, असे शहा म्हणाले. 

हे पण वाचा  देशभर शिकवला जाणार छत्रपतींचा जाज्वल्य इतिहास

थोरले बाजीराव पेशवे यांची युद्धनीती कालबाह्य होणारी नाही. त्याचा अभ्यास करून आपली रणनीती निश्चित केल्यास कोणीही भारताकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही, असे शहा यांनी नमूद केले

पुण्यनागरी ही वीरांची भूमी आहे. स्वातंत्र्यासाठी इंग्रजांबरोबर संघर्ष करण्यासाठी पहिली हाक लोकमान्य टिळक यांनी पुण्यातूनच दिली. एकटा माणूस देशासाठी किती मोठ्या प्रमाणात कार्य करू शकतो हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दाखवून दिले, असे ते म्हणाले. 


About The Author

Advertisement

Latest News

Advt