हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर पक्षातील निष्ठावंतांचे आव्हान

इंदापूरमध्ये तिसरा पर्याय देण्यासाठी नाराज निष्ठावंतांचे प्रयत्न

हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर पक्षातील निष्ठावंतांचे आव्हान

इंदापूर: प्रतिनिधी 

भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा संपुष्टात आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेले हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षातील निष्ठावंतांचेच आव्हान निष्ठावंतांमध्ये

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून महायुतीची कास धरल्यानंतर इंदापूर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील यांच्यासह त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा असलेली मुलगी अंकिता पाटील यांचे राजकीय भवितव्य टांगणीला लागण्याचे चित्र स्पष्ट होताच हर्षवर्धन पाटील यांनी आत्तापर्यंत ज्यांच्याशी राजकीय संघर्ष केला त्या शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.

हर्षवर्धन पाटील यांच्या रूपाने भारतीय जनता पक्षातील एक प्रभावशाली नेता शरद पवार यांच्या गळाला लागल्याची चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांच्या बंडानंतरही इंदापूर तालुक्यात शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यांनी आता हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात बंड पुकारून आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याशिवाय इंदापूरच्या मतदारांसाठी तिसरा पर्याय उभा करण्यासाठी चंग बांधला आहे. 

हे पण वाचा  'जाहिरात, होर्डिंग नको, मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान द्या'

शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असलेले सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने यांच्यासह पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी भरत शहा या तिघांसह अनेक निष्ठावंत नेत्या, कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आगामी विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देण्यात आली तर त्यांच्या विरोधात मूळच्या निष्ठावंत गटातील उमेदवार उभा करण्याची तयारी करण्यात आली आहे. यापूर्वी शरद पवार यांच्या निष्ठावंतांपैकी सहा जणांनी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. आमच्या सहा जणांपैकी कोणालाही उमेदवारी द्या. त्यांच्यासाठी आम्ही एकत्रित येऊन काम करू. मात्र, खुद्द शरद पवार यांचा अपमान करणाऱ्यांना उमेदवारी देण्यात आली तर आपण बंडाचा झेंडा उभा करू, असा इशारा हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशापूर्वीच या निष्ठावंतांनी दिला होता. 

About The Author

Advertisement

Latest News

Advt