- राज्य
- 'मातोश्रीवर बसलेले खरे शकुनी मामा ओळखा'
'मातोश्रीवर बसलेले खरे शकुनी मामा ओळखा'
नितेश राणे यांचे राज ठाकरे यांना आवाहन
मुंबई: प्रतिनिधी
हिंदी सक्तीच्या नावाखाली उर्दूला प्रोत्साहन देऊ पाहणारे मातोश्रीवर बसलेले खरे शकुनी मामा ओळखा, असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना केले आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी एकही माणूस मराठीत बोलत नाही, अशा नया गाव परिसरात सभा घेऊन दाखवा, अशा शब्दात त्यांना आव्हानही दिले.
महाराष्ट्रात राहत असाल तर मराठी आलीच पाहिजे, असं मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अन्य भाषिकांना उद्देशून म्हणाले. मराठी शिका, आमचं काही तुमच्याशी भांडण नाही. मात्र,मस्ती करणार असाल तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. राज ठाकरेंच्या मीरारोडमधील सभेनंतर मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पहिली ते पाचवी हिंदी शिकवण्याची सक्ती करण्याचा प्रयत्न तर करून बघा, राज्यातील दुकानंच नाही तर शाळाही बंद करू, असं आव्हान राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलेआहे. यावर बोलताना, शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा. तिथे मराठी शिकवली जात नाही, औपचारिक शिक्षण दिले जात नाही, असं नितेश राणेंनी सांगितलं.
तुम्ही कानाखाली मारायचा म्हणता, तर नयानगरला जाऊन मारा. तिथे कानाखाली आवाज काढून दाखवा. हिंदूंना मारण्यापेक्षा गोल टोपी वाल्यांना मारुन दाखवा, असे आव्हानही नितेश राणेंनी ठाकरे यांना दिले. भारताचे इस्लाम राष्ट्र होऊ नये, यासाठी हिंदूने एकत्र यायला पाहिजे. 'एक है तो सेफ है, असेही नितेश राणे म्हणाले. हिंदू लोकांसोबत सरकार आहे. हिंदूंवर जर कोणी हात उचलणाऱ्यांना सोडणार नाही, असे नितेश राणे म्हणाले.
राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करणारच असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका मुलाखतीत म्हणाले. त्यावर राज ठाकरे यांनी, पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, राज्यातील दुकानंच नाही तर शाळाही बंद करू. सरकारला हिंदी सक्तीची करून आत्महत्याच करायची असेल तर त्यांनी करावी, असे ठाकरे सभेत म्हणाले. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीची सक्ती सोडून हिंदीच्या सक्तीसाठी प्रयत्न का करतोय? कोण दबाव आणत आहे तुमच्यावर, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.