वडगाव मावळची भूमी भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे प्रतीक
मला तुम्ही परत बोलवा मी नक्की येईल;केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे विधान
वडगाव मावळ/प्रतिनिधी
वडगाव मावळची भूमी मराठा साम्राज्याची केवळ प्रतिक नसुन भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे प्रतीक आहे .मला तुम्ही परत बोलवा मी नक्की येईल व तसेच या ठिकाणाचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून आपण विकास करू.असे भावूक उद्गगार केंद्रीय दूरसंचारमंत्री ज्योतिरादित्यशिदे यांनी वडगाव मावळ येथे काढले.
वडगाव मावळ येथील श्रीमंत सरदार महादजी शिंदे स्मारकाला मंगळवार दि २८ रोजी केंद्रीय दळणवळणमंत्री आणि ईशान्य क्षेत्राचे विकासमंत्री जोतिरादित्य शिदे यांनी सदिच्छा भेट दिली व ग्रामस्थांशी संवाद साधला.
यावेळी या कार्यक्रमास पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूड्डी, मावळ तालुका तहसीलदार विक्रम देशमुख, वडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम उपस्थित होते. तसेच सदर कार्यक्रमाचे नियोजन वडगांव नगरपंचायतचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रविण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी कर्मचारी यांनी केले
एक-एक मावळा जमवून छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. सुरुवातीला अवघे २० किल्ले असताना पराक्रमाची शर्थ करीत आणि गनिमी कावा यांचा अवलंब करून अत्यंत कमी काळात ३६५ किल्ल्यांचे स्वराज्य विस्तारित करण्याचे सामर्थ्य असणाऱ्या छत्रपती शिवरायांकडे होते. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरून अनेक सरदारांनी अटकेपार घोडदौड केली, असे सांगून ज्योतिरादित्य शिंदे यांनी पानिपतच्या रणसंग्रामाला उजाळा दिला
इथल्या वाड्याचा दगड आणि दगड आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची साक्ष देत असल्याचे सांगून राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, धर्मवीर संभाजीराजे यांच्या संकल्पनेतील स्वराज्य पुढे नेण्याचे काम अनेक सरदारांनी केले.त्यात श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांचे योगदान बहुमोल असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
About The Author
![Satish Gade Picture](https://marathi.thedemocrat.in/media/100/2024-07/satish-gade.jpeg)
Comment List