विश्वासघातकी चीनची लद्दाखवर पुन्हा वक्रदृष्टी

एकीकडे चर्चेचे गुऱ्हाळ तर दुसरीकडे डिवचण्याचे प्रयत्न

विश्वासघातकी चीनची लद्दाखवर पुन्हा वक्रदृष्टी

नवी दिल्ली: प्रतिनिधी

भारताशी सलोखा प्रस्थापित करण्यासाठी एकीकडे चर्चांचे गुऱ्हाळ सुरू ठेवायचे आणि दुसरीकडे भारताला डिवचण्याची, कुरघोडी करण्याची एकही संधी वाया जाऊ द्यायची नाही, हे चीनचे विश्वासघातकी धोरण पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. चीनने नुकतीच दोन नव्या विभागांच्या स्थापनेची घोषणा केली असून त्यातील एका विभागात भारताच्या लद्दाखचा काही भूभाग अंतर्भूत करण्यात आला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने चीनच्या या कृतीचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. 

चीनच्या होटन प्रांतात चीनने नव्या दोन विभागांच्या स्थापनेची घोषणा केली आहे. त्यामध्ये लद्दाखच्या भूभागाचा समावेश असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. भारतीय भूभागात चीनची घुसखोरी कदापिही सहन करून घेतली जाणार नाही, असे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले. 

चीनला भारताचा कोणताही भूभाग जबरदस्तीने गिळंकृत करता येणार नाही. त्यांचे हे बेकायदेशीर कृत्य वैध मानले जाणार नाही. चीनच्या या कुरापतखोर कृतीचा आम्ही कठोर निषेध करत आहोत, असेही जयस्वाल म्हणाले. 

चीन सध्या आर्थिकदृष्ट्या संकटात आहे. अशावेळी भारतासारख्या शेजारी राष्ट्राशी तणावपूर्ण संबंध चीनला परवडणारे नाहीत. त्यामुळे भारताशी जुळवून घेण्याचे चीनकडूनच प्रयत्न केले जात आहेत. लद्दाखच्या पूर्व भागात समोरासमोर उभ्या ठाकलेल्या चीन आणि भारतीय सैन्यांनी तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून माघार घेतली आहे. त्याचप्रमाणे विविध करारांच्या माध्यमातून विविध क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढविण्याचे दोन्ही देशांचे प्रयत्न आहेत. मात्र, चीनच्या दुटप्पी वागण्यामुळे या प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

 

 

Share this article

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

धारदार शस्त्राने वार करुन तरुणाची निर्घृण हत्या, तळेगाव दाभाडे येथील धक्कादायक घटना
वडगाव मावळची भूमी भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे प्रतीक
'... म्हणून केली बाबा सिद्दिकी यांची हत्या,
Amritsar News | अमृतसर मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबनेचा तीव्र निषेध - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले 
आमदार सुनील शेळके यांचा वडगाव शहरात जनसंवाद यात्रेनिमित्त नागरिकांशी संवाद
तळागाळातील माध्यमांचा उत्सव: साधना हायपर-लोकल जर्नलिझम पुरस्कारांचे उद्घाटन!
मिशन मोडवर काम करून तालुक्यातील पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करा
प्रियंका इंगळेच्या नेतृत्वात भारताने जिंकला खो-खो विश्वचषक
... तर देशात अराजकाची भीती
तळेगाव- एमआयडीसी पोलीस ठाण्यात बालस्नेही पोलीस कक्ष सुरू