'... म्हणून केली बाबा सिद्दिकी यांची हत्या,
मुख्य मारेकरी शिवकुमार गौतम याच्या जबाबाचा आरोपपत्रात खुलासा
मुंबई: प्रतिनिधी
बाबा सिद्दिकी यांचे आंतरराष्ट्रीय डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध होते आणि मुंबई साखळी बॉम्बस्फोटात यांचा सहभाग होता, असे सांगून बिश्नोई टोळीने आपल्याला त्यांची हत्या करण्याचे आदेश दिले, असे मुख्य मारेकरी शिवकुमार गौतम याने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले आहे. या जबाबदाचा समावेश असलेले साडेचार हजार पानांची आरोपपत्र पोलिसांनी न्यायालयात दाखल केले आहे.
बाबा सिद्दिकी यांची त्यांचे पुत्र माजी आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोर दुचाकी वरून आलेल्या मारेकऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. या हत्येमागे बिश्नोई टोळीचा हात असल्याचा आरोप आहे. गौतम, हरीश कुमार कश्यप, गुरमेल सिंग त्याच्याशिवाय अन्य सहा जणांचे जबाब आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणात गौतम हा मुख्य मारेकरी असून शुभम लोणकर, यासीन अख्तर आणि अनमोल बिश्नोई हे फरारी आरोपी आहेत.
कश्यप यांच्या माध्यमातून आपली आणि प्रवीण लोणकर, शुभम लोणकर यांची ओळख झाली. लोणकर बंधूंनी आपण बिश्नोई टोळीसाठी काम करीत असल्याचे सांगितले. दाऊद याच्याशी संबंधित असलेल्या आणि 1993 मुंबई बॉम्बस्फोटात सहभाग असलेल्या सिद्दिकी यांची हत्या केल्यास 15 लाख रुपये मिळतील असे अनमोल बिश्नोई याने आपल्याला व्हिडिओ कॉल वर सांगितले, असे शिवकुमार गौतम याने जबाबात सांगितले आहे.
झिशान यांचा राजकीय नेत्यांवर आरोप
झिशान सिद्दिकी यांनी बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमागे बांधकाम व्यावसायिकांचा हात असल्याचा आरोप केला आहे. त्याचप्रमाणे या कटात भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचाही समावेश असल्याचा आरोप झिशान यांनी केला आहे.
Comment List