विश्व हिंदू परिषद मावळ तालुका बजरंग दलाच्या वतीने वडगावात तहसिल कार्यालय मोर्चा
प. बंगालमधील ममता सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी
वडगाव मावळ/ प्रतिनिधी
पश्चिम बंगालमध्ये हिंदू समाजावर सातत्याने होणारे हल्ले, जाळपोळ, धार्मिक द्वेष भावना वाढविणारे प्रकार आणि शासन यंत्रणेचे अपयश हे चिंतेचे कारण बनले आहे.त्यामुळे पश्चिम बंगालचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद व मावळ तालुका बजरंग दलाच्या वतीने शनिवार ( दि १९ ) मावळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले
यावेळी विश्व हिंदू परिषदे बजरंग दलाचे मावळ मंत्री सोमनाथ दाभाडे, जिल्हा मंत्री महेंद्र असवले, प्रांत सहसंयोजक संदेश भेगडे, तालुकामंत्री अमोल पगडे, सहमंत्री आकाश वारुळे, सचिन शेलार, योगेश शेटे, प्रखंड मंत्री बजरंग कांबळे, दर्शन वहिले, भूषण वहिले, अनंता कुडे, अमोल ठोंबरे, किरण आचार्य, योगेश ढोरे, निखिल भांगरे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
निवेदनात म्हटले आहे की
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी झाल्या असून येथील कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे, पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारबाबत मौन बाळगले आहे, मुस्लिम मतांसाठी ममता बॅनर्जी या लाचार झाल्या आहेत. कायम हिंदू विरोधी भूमिका ममता बॅनर्जी सरकारने घेतली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये हिंदूंचे जगणे मुश्किल झाले असून यामुळे ममता बॅनर्जी यांचा जाहीर निषेध करण्यात आला
पश्चिम बंगालमध्ये वक्फ बोर्ड कायद्याविरोधात होत असलेल्या आंदोलनात हिंदूंना टार्गेट करून त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. त्यांच्याव अत्याचार केले जात आहेत. तेथील हिंसाचाराची एनआयएमार्फत चौकशी करावी, दोषींना विनाविलंब कडक शिक्षा करावी, तेथील कायदा सुव्यवस्था केंद्रीय सुरक्षा दलाकडे सोपवावी, ममता सरकारने अडवलेले बंगाल व बांगलादेश दरम्यान असलेल्या ४५० किलोमीटर सीमेला तारेचे कंपाउंड करण्याचे काम त्वरित पूर्ण करावे, आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार कार्यालयात देण्यात आले. वडगाव शहर भाजपचे माजी अध्यक्ष अनंता कुडे यांनी आभार मानले.
About The Author
