चित्रपट महामंडळ मतदार यादीचा वाद उच्च न्यायालयात
मतदारयादीतून नावे वगळल्याबद्दल याचिका दाखल
अखिल भारतीय चित्रपट महासंघाचे अधिकृत सभासदत्व असूनही अनेकांची नावे आगामी निवडणुकीच्या मतदार यादीतून वगळल्याच्या निषेधार्थ केलेल्या तक्रारीची दखल संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी क्षुल्लक तांत्रिक कारण दाखवून घेण्याचे नाकारल्याने मेघराज राजेभोसले यांच्या पुढाकाराने मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
पुणे: प्रतिनिधी

महामंडळाचे वर्ग ब सभासदत्व तीन वर्षे धारण केल्यानंतर महामंडळाचे सभासदत्व वर्ग अ धारण करता येते. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक सभासदांनी वर्ग अ ची सभासदत्व प्राप्त केले आणि अशा प्रकारचे ओळखपत्र देखील संस्थेकडून त्यांना बहाल करण्यात आले. या सभासदांनी वर्ग अ सभासत्वाचे शुल्क देखील वेळोवेळी संस्थेस देऊ केले. परंतु होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये अशा सभासदांची नावे मतदारयादीत नमूद नसल्याने त्यांनी निवडणूक अधिकारी यांच्याकडे हरकती दाखल केल्या. त्यास अनुसरून निवडणूक अधिकाऱ्यांनी निकाल दिला. तांत्रिक कारण पुढे करत या सभासदांचा निवडणुकीचा आणि मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला.
या निर्णयाविरुद्ध नाराज सभासदांनी मुंबई उच्च न्यायालयात अँडव्होकेट युवराज नरवणकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी लवकरच मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. गौतम पटेल आणि न्या. दिघे यांच्या खंडपीठासमोर होणार आहे.
Comment List