पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पांडुरंग सांडभोर

सन २०२३- २४ साठी नव्या कार्यकारिणीची निवड

पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पांडुरंग सांडभोर

पुणे : प्रतिनिधी
 
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पुढारीचे वरिष्ठ बातमीदार पांडुरंग सांडभोर, उपाध्यक्षपदी सकाळचे वरिष्ठ बातमीदार उमेश शेळके व महाराष्ट्र टाइम्सचे छायाचित्रकार स्वप्नील शिंदे, सरचिटणीसपदी तरुण भारतचे सुकृत मोकाशी (बिनविरोध), तर खजिनदारपदी प्रभातच्या वरिष्ठ बातमीदार अंजली खमितकर यांची निवड झाली. २०२३-२४ या वर्षाकरिता नवीन कार्यकारिणीची निवडणूक रविवारी (३० जुलै) झाली.
 
चिटणीसपदी पुढारीच्या बातमीदार प्रज्ञा केळकर व राष्ट्रसंचारच्या बातमीदार पूनम काटे यांची बिनविरोध निवड झाली. कार्यकारिणी सदस्य म्हणून हर्ष दुधे (महाराष्ट्र टाइम्स), वरद पाठक (महाराष्ट्र टाइम्स), विक्रांत बेंगाळे (आज का आनंद), शहाजी जाधव (सकाळ), श्रद्धा सिदीड (महाराष्ट्र टाइम्स), विनय पुराणिक (पुण्यनगरी), गणेश राख (सामना), संभाजी सोनकांबळे (लोकमत), शंकर कवडे (पुढारी), भाग्यश्री जाधव (पुढारी) यांची निवड झाली आहे.
 
 ऍड. प्रताप परदेशी, ऍड. स्वप्नील जोशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पहिले.

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

'आम्ही बहिणींचे लाडके, त्यामुळे तुम्ही झाले दोडके'
'विधानसभा निवडणुकीतील महायुतीचा विजय डुप्लिकेट'
आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देण्यासाठी एलपीओ हॉलिडेजकडून ‘एक्सक्लुझिव्ह B2B ट्रॅव्हल एजंट्स मीटचं आयोजन!
'कबरीला कायदेशीर संरक्षण, तरी नाही महिमामंडण'
बार्टी, पुणे मार्फत अनुसुचित जातीच्या उमेदवारांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण
धर्मा प्रॅाडक्शन्स - एव्हीके पिक्चर्स घेऊन येत आहे ‘ये रे ये रे पैसा ३’ 
'लवकरच जाणार मंत्रिमंडळातील सहा सात मंत्र्यांचा बळी'
अजित पवारांनी काँग्रेसला पाडले मोठे खिंडार
श्री विघ्नहर साखर कारखान्यावर सत्यशील शेरकर यांची निर्विवाद सत्ता
कुसुमाग्रज स्मारकाला डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट