OLA Electric | ओला इलेक्ट्रिककडून फेब्रुवारीतील तात्पुरत्या नोंदणी बॅकलॉगवर स्पष्टीकरण!

मार्च अखेरीस पूर्ण निराकरणाचा विश्वास

OLA Electric | ओला इलेक्ट्रिककडून फेब्रुवारीतील तात्पुरत्या नोंदणी बॅकलॉगवर स्पष्टीकरण!

ओला कंपनी ही नेहमीच ग्राहकांसोबत पारदर्शकता आणि विश्वासर्हतेसह सेवा देण्यासाठी कार्यशील आहे. ओला एलेक्ट्रीक कंपनीतील फेब्रुवारी 2025 मध्ये  झालेल्या विक्री संबंधीचे खोटे तपशील सर्वत्र पसरवले जात आहेत. फेब्रुवारी महिन्यातील तात्पुरता बॅकलॉग हा वाहन नोंदणीतील विक्रेत्यांसोबत सुरू असलेल्या चर्चेमुळे निर्माण झाला आहे.

याबाबात ओला इलेक्ट्रीक मोबिलीटी लिमिटेडचे सेक्रटरी प्रितम मोहपात्रा यांनी स्पष्ट केले की, सध्याच्या नोंदणी संख्येत तिन्ही महिन्यांच्या सरासरी विक्रीपेक्षा 50% अधिक वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यातील बॅकलॉगपैकी 40% बॅकलॉग आधीच सोडवला गेला आहे आणि उर्वरित बॅकलॉगचे निराकरण मार्च 2025च्या अखेरीपर्यंत होईल.हा बॅकलॉग वेगाने निकाली काढण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

हा केवळ तात्पुरत्या नोंदणी बॅकलॉगचा प्रकरण असूनही, काही माध्यमांकडून चुकीची माहिती प्रसारित झाली.विशेषतः, ओला इलेक्ट्रीकल कंपनीने दोन राष्ट्रीय विक्रेत्यांसोबतच्या नोंदणी प्रक्रियेतील करारांना स्थगित केल्यानंतर,संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीने चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न होत आहे.

बॅकलॉग पूर्णपणे सोडवण्यासाठी ओला एलेक्ट्रीक कंपनी कार्यरत आहे.

000

About The Author

Advertisement

Latest News

पिंपरी - चिंचवड स्मार्ट सिटी आणि महापालिका इंटीग्रेटेड  सॉफ्टवेअर वर्षाअखेरीस कार्यान्वित पिंपरी - चिंचवड स्मार्ट सिटी आणि महापालिका इंटीग्रेटेड  सॉफ्टवेअर वर्षाअखेरीस कार्यान्वित
  मुंबई : स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार 50 टक्के आणि राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था प्रत्येकी 25 टक्के
'भारतातील जनता नाही तर नेतेच जातीयवादी'
'सुशांतसिंग राजपूतची हत्या नव्हे तर आत्महत्याच'
पुणेकरांचे प्रेम कधीही विसरू शकत नाही - अशोक सराफ
समाजाचा ढळलेला तोल सावरण्यासाठी श्री स्वामी समर्थांचे स्मरण आवश्यक!
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर पळून जाताना पोलीस झोपले होते का? : हर्षवर्धन सपकाळ
औंध रुग्णालयाच्या आवारात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारावे

Advt