'सुशांतसिंग राजपूतची हत्या नव्हे तर आत्महत्याच'

तपास बंद केल्याच्या अहवालात केंद्रीय अन्वेषण विभागाचा दावा

'सुशांतसिंग राजपूतची हत्या नव्हे तर आत्महत्याच'

नवी दिल्ली: प्रतिनिधी

बॉलीवूड मधील आश्वासक बनलेला अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची हत्या झाली नसून त्याने आत्महत्या केली असल्याचा दावा केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तपास बंद केल्याच्या अहवालात (क्लोजर रिपोर्ट) केला आहे. सुशांतला आत्महत्या करण्यास कोणीही प्रवृत्त केलेले नाही, असे नमूद करतानाच त्याची कथित प्रेयसी रिया चक्रवर्ती हिला सीबीआयने दिलासा दिला आहे. आता सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट न्यायालय स्वीकारणार की आणखी तपास सुरू ठेवण्याचे आदेश देणार, याबद्दल उत्सुकता आहे. 

सुशांतसिंग राजपूत या अभिनेत्याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयने साडेचार वर्ष केला. सुशांतसिंग राजपूत याचा 14 जून 2020 मध्ये वांद्रे पश्चिम येथील त्याच्या राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाला. ऑगस्टपासून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. या तपासा दरम्यान सीबीआयने रिया चक्रवर्तीसह सुशांतच्या अनेक निकटवर्तीयांचे जबाब घेतले. तसेच एम्स रुग्णालयाने न्यायवैद्यक अहवाल सीबीआयकडे सादर केले. 

दरम्यान, तपास सुरू असताना सुशांतचे वडील के के सिंग यांनी रिया चक्रवर्ती हिने सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला. त्याचप्रमाणे तिने सुशांतची आर्थिक फसवणूक केल्याचा दावाही केला. मात्र, या आरोपात तथ्य असल्याचे तपासात आढळून आले नाही, असे सीबीआयने क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. त्याचप्रमाणे सुशांतचा गळा दाबल्याचे अथवा त्याच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचे न्यायवैद्यक अहवालात दिसून आले नसल्याचे ही सीबीआयचे म्हणणे आहे. 

हे पण वाचा  '... तेव्हा झाला नाही का बाळासाहेबांचा अपमान?'

सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलीवूडमध्ये प्रचंड मोठी खळबळ माजली. केवळ एका अभिनेत्याच्या मृत्यूपुरता हा विषय मर्यादित न राहता बॉलीवूडला पडलेला अमली पदार्थांचा विळखा ते बॉलीवूडमधील नवोदित  अभिनेत्यांची गळचेपी, घराणेशाही, कंपूशाही असे अनेक गंभीर विषय या घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले. 

About The Author

Advertisement

Latest News

अमेरिकेच्या हुतींवरील हल्ल्याची संपूर्ण योजना उघड अमेरिकेच्या हुतींवरील हल्ल्याची संपूर्ण योजना उघड
वॉशिंग्टन: वृत्तसंस्था  अमेरिकेने हुती बंडखोरांवर निर्णायक हल्ले चढविण्यासाठी आखलेली योजना थेट एका पत्रकारापर्यंत पोहोचली. त्याने त्यावर लेख लिहून प्रत्यक्ष योजनेसह...
'मंगळवार पेठेतील जागा आंबेडकर स्मारकासाठीच'
Prashant Koratkar Arrested | प्रशांत कोरटकरला तेलंगणात अटक!
अखेर प्रशांत कोरटकर जेरबंद
'ट्रोलिंग हा सिनेसृष्टीतील नवा धंदा'
'... तेव्हा झाला नाही का बाळासाहेबांचा अपमान?'
गुढीपाडव्या निमित्त चंदुकाका सराफ ज्वेल्स यांच्या धमाकेदार ऑफर्स!

Advt