डिफेक्स 2025 राज्यस्तरीय स्पर्धेत JSPM संचलित भिवराबाई सावंत पॉलीटेक्निक ला प्रथम पारितोषिक 

डिफेक्स 2025 राज्यस्तरीय स्पर्धेत JSPM संचलित भिवराबाई सावंत पॉलीटेक्निक ला प्रथम पारितोषिक 

वाघोली : कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पुणे येथे दि. ३ ते ६ एप्रिल च्या दरम्यान सीओईपी टेकनॉलॉजिकल युनिव्हर्सिटी ,अखिलभारतीय विद्यार्थी परिषद, सृजन ट्रस्ट कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने "डिपेक्स २०२५" राज्यस्तरीय प्रोजेक्ट प्रदर्शन व स्पर्धा, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातील पॉलिटेक्निक अभियांत्रिकी कृषी आयटीआय च्या विद्यार्थ्यांसाठी प्रोजेक्ट कॉम्पिटिशन आणि प्रदर्शन घेण्यात आली. 

त्या प्रोजेक्ट प्रदर्शन व कॉम्पिटिशन मध्ये जे एस पी एम संचलित भिवराबाई सावंत पॉलीटेक्निक च्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील रुपेश मावकर आर्यन साळुंखे करण आवारदे प्रजवेल पटेकर या विद्यार्थ्यांनी "रियल टाईम वेहिकल लोड इंडिकेटर" हा प्रोजेक्ट उत्कृष्टरित्या सादर केला आणि त्या ठिकाणी परीक्षण होऊन डिपेक्स 2025 मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला या पारितोषिकात सन्मानचिन्ह आणि 25000 रोख देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर प्रोजेक्टला बेस्ट एम.एस बी.टी.ई  प्रोजेक्ट अवॉर्ड  मिळाला.

या प्रोजेक्टसाठी प्रा व्ही बी टकले यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या  यशाबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव प्रा डॉ तानाजीराव सावंत संस्थेचे उपाध्यक्ष गिरीराज सावंत वाघोली शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ वसंत बुगडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ  सुभाष देवकर उपप्राचार्य डॉ  पी टी काळे प्रा एन इ भुतेकर प्रा डॉ  वैशाली दाभाडे प्रा सोनाली गायकवाड डॉ संदीप पोखरकर प्रा मोनिका कस्मिरे डॉ एस एम यादव आदींनी अभिनंदन केले.

000

हे पण वाचा  व्हिंटेज व क्लासिक कार्स प्रदर्शनात "योहान पूनावाला" यांचा विशेष सत्कार  

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

Advt