ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाने देशभक्तीची ज्योत मनामनात प्रज्वलीत करणारे अभिनेते हरपले
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वाहिली श्रध्दांजली
मुंबइ - ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांच्या निधनाने भारतीय चित्रपट सृष्टीची मोठीहानी झाली आहे.मनामनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलीत करणारे ते ज्येष्ठ अभिनेते होते. देशभक्तीपर चित्रपट आणि गीतांमुळे देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतविणारे अभिनेते मानेजकुमार हे सर्व भारतीयांच्या मनात कायम जिवंत राहतील.अशा शब्दात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी ज्येष्ठ अभिनेते दिवगंत मनोजकुमार यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे.
ज्येष्ठ अभिनेते दिवगंत मनोजकुमार हिंदी चित्रपट सृष्टीचे अष्टपैलु अभिनेते होते.त्यांच्या अभिनयाने अनेक हिंदी सिनेमे गाजले आहेत. देशातच नव्हे तर संपूर्ण जगात मनोजकुमार यांचा चाहता वर्ग राहिलेला आहे.त्यांचा क्रांती हा सिनेमा अजरामर सिनेमा ठरला आहे. त्यांच्या सिनेमातील देशभक्तीपर गीते आज मनामनात देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवितात. देशभक्तीपर चित्रपट निर्मितीतुन अनोखी देशसेवा करणारा हा महान अभिनेता होता. मनोजकुमार यांनी शिर्डी के साईबाबा हा सिनेमा काढुन शिर्डी के साईबाबाची महती देशातच नव्हे तर जगभारत पोहोचवली.शिर्डी मध्ये त्यांनी गरिबांसाठी एक रुग्णालय ही सुरु केले आहे.त्यामुळे समाजसेवा आणि गरिबांची सेवा चित्रपटातुन देशभक्ती आणि गरिबांना प्रगती चे प्रेरणा देणारा दिनदुबळ्या,गरिबाप्रती मनामध्ये सदभावना,आपुलकी ठेवणारा हा अभिनेता होता. ज्येष्ठ अभिनेते दिवगंत मनोजकुमार यांनी निर्माण केलेले चित्रपट आणि अभिनय अजरामर आहेत. या देशभक्त असणाrऱ्या चित्रपट अभिनेत्याला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. पदश्री पुरस्कारांने त्यांना गौरवण्यात आले आहे. मनोजकुमार यांच्या चित्रपट सृष्टीतुन देशासाठी दिलेले योगदान नेहमी अविस्मरणीय राहिल. ज्येष्ठ अभिनेते दिवगंत मनोजकुमार यांना ना.रामदास आठवले यांनी भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे .
000