वडगावाचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज उत्सवाला उद्यापासून सुरुवात

वडगावाचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज उत्सवाला उद्यापासून सुरुवात

वडगाव मावळ प्रतिनिधी 

मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान, असलेल्या वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज यांच्या चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त 12 व 13 एप्रिल रोजी विविध धार्मिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे व उत्सव समितीचे अध्यक्ष सुधीर ढोरे व बाळासाहेब तुमकर यांनी दिली.

शनिवारी (दि. १२) पहाटे ४ वाजता श्री पोटोबा महाराजांच्या अभिषेक व महापूजेने उत्सवाची सुरुवात होणार आहे. सकाळी ६ वाजता श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा, सकाळी ७ वाजता छबिना, दुपारी ४ वाजता मानाचे बगाड, सायंकाळी ५ वाजता मनाच्या काठ्या, रात्री ८ वाजता फटाक्यांची आतषबाजी व रात्री १० नंतर भजन स्पर्धा होणार आहेत. भजन स्पर्धेसाठी अनुक्रमे १५ हजार, १२ हजार, १० हजार, ८ हजार, ५ हजार अशी ५० हजार रुपयांची रोख बक्षीसे असून प्रत्येक सहभागी संघास २ हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच, रात्री ९ वाजता प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील यांचा मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहे. 

रविवारी सकाळी पालखी प्रदक्षिणा होणार असून, यामध्ये आळंदी येथील बाल भजनी मंडळाचा समावेश खास आकर्षण असणार आहे. सायंकाळी ६ वाजता निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा होणार असून, निकाली कुस्त्यांसाठी १० हजार रुपयांपर्यंत रोख इनाम देण्यात येणार आहे. 

हे पण वाचा  'वी द पीपल;'ने जागवल्या बहुजन महानायकांच्या स्मृती

देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे उपाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे सचिव अनंता कुडे, खजिनदार चंद्रकांत ढोरे, भास्करराव म्हाळसकर सुभाष जाधव, तुकाराम ढोरे, अरुण चव्हाण, अशोक ढमाले, तुकाराम काटे, सुनिता कुडे, यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवाचे कमिटीचे  अध्यक्ष सुधीर ढोरे, कार्याध्यक्ष बाळासाहेब तुमकर, कार्यक्रम प्रमुख अतुल ढोरे, विशाल म्हाळसकर, उपाध्यक्ष किरण म्हाळसकर, सोमनाथ धोंगडे, प्रशांत भिलारे, अनिल ओव्हाळ, सचिव तुषार वहिले, विनोद ढोरे, खजिनदार अनिल कोद्रे, शेखर वहिले, प्रसिद्धीप्रमुख संजय दंडेल, सल्लागार गणेश ढोरे, भाऊसाहेब ढोरे, राजेंद्र म्हाळसकर, शिवाजी येळवंडे, संदीप वहिले, भूषण मुथा, अतुल राऊत, सुहास विनोदे, सदस्य अक्षय बेल्हेकर, विनायक लवंगारे, योगेश वाघवले, सतीश गाडे. पप्पू ढोरे, समीर दंडेल, सूर्यकांत भिलारे, संकेत चव्हाण, अभिमन्यू कुडे, निखिल वहिले, स्वप्नील ढोरे, अभिजित ढोरे, अमोल ढोरे, अर्पण ढोरे करत आहेत.

Tags:

About The Author

Satish Gade Picture

Correspondent, Vadgaon Maval

Advertisement

Latest News

विश्व हिंदू परिषद मावळ तालुका बजरंग दलाच्या वतीने वडगावात तहसिल कार्यालय मोर्चा विश्व हिंदू परिषद मावळ तालुका बजरंग दलाच्या वतीने वडगावात तहसिल कार्यालय मोर्चा
वडगाव मावळ/ प्रतिनिधी  पश्चिम बंगालमध्ये हिंदू समाजावर सातत्याने होणारे हल्ले, जाळपोळ, धार्मिक द्वेष भावना वाढविणारे प्रकार आणि शासन यंत्रणेचे अपयश...
फुले सिनेमा समाजप्रबोधन करणारा क्रांतिकारी सिनेमा ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
इंग्रजीला पालखी आणि हिंदीला विरोध हा कुठला विचार?
चाफेकर बंधुंचे स्मारक देशभक्तीचे संस्कार देणारे केंद्र
'भाषा शिकण्यावरून वाद हा रिकाम टेकड्यांचा उद्योग'
चाकणसह छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार टेस्लाचे उत्पादन
संग्राम थोपटे लवकरच होणार भाजपमध्ये डेरेदाखल

Advt