यशराज फिल्म्स चा ऐतिहासिक ब्लॉकबस्टर ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’

लंडनच्या लीसेस्टर स्क्वेअरमध्ये पुतळ्याने सन्मानित होणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे!

यशराज फिल्म्स चा ऐतिहासिक ब्लॉकबस्टर ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’

हार्ट ऑफ लंडन बिझनेस अलायन्सने आज जाहीर केलं की लीसेस्टर स्क्वेअरमधील ‘सीन्स इन द स्क्वेअर’ या चित्रपट ट्रेलमध्ये आता एक नवीन मूर्ती सामील होणार आहे आणि ती आहे यशराज फिल्म्सच्या ऐतिहासिक ब्लॉकबस्टर दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (DDLJ) ची! ही लंडनच्या लीसेस्टर स्क्वेअरमध्ये उभारली जाणारी पहिली भारतीय चित्रपट मूर्ती ठरेल! याचबरोबर DDLJ च्या 30 व्या वर्धापन दिनाच्या उत्सवाचीही सुरुवात होईल – हा चित्रपट एक अजरामर आणि पुरस्कारप्राप्त रोमँटिक कॉमेडी आहे, ज्याने आदित्य चोप्रा यांचा दिग्दर्शक म्हणून डेब्यू केला होता.

ही कांस्य मूर्ती बॉलिवूडचे दोन सुपरस्टार – शाहरुख खान आणि काजोल – यांना DDLJ मधील प्रसिद्ध पोजमध्ये दाखवेल. या वर्षीच्या वसंत ऋतूमध्ये या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. आज झालेली ही घोषणा याचे उदाहरण आहे की ब्रिटनमधील 50 लाखांहून अधिक दक्षिण आशियाई समुदाय DDLJ या चित्रपटावर किती प्रेम करतो. हा चित्रपट भारत आणि जागतिक दक्षिण आशियाई समाजासाठी एक पॉप-संस्कृतीचा महत्त्वाचा टप्पा आहे.

DDLJ मध्ये राज आणि सिमरन या दोन एनआरआयंची कथा आहे, जी युरोप आणि भारतात फिरते, आणि जी किंग्स क्रॉस स्टेशन येथून सुरू होते. विशेष बाब म्हणजे, लीसेस्टर स्क्वेअरचा भाग DDLJ मधील एका दृश्यात दिसतो, जिथे राज आणि सिमरन पहिल्यांदा (अनभिज्ञपणे) भेटतात. या दृश्यात स्क्वेअरमधील दोन प्रमुख सिनेमागृह दिसतात — राज Vue सिनेमा समोर आहे, आणि सिमरन Odeon स्क्वेअरच्या पुढे चालत आहे.

हा नवीन पुतळा Odeon सिनेमा बाहेरील पूर्व टेरेसवर बसवला जाईल, त्या दृश्याच्या सन्मानार्थ. चित्रपटात लंडनमधील इतर ठिकाणं — Horseguards Avenue, Hyde Park, Tower Bridge, आणि King’s Cross Station देखील दाखवण्यात आली आहेत.

हे पण वाचा  व्हिंटेज व क्लासिक कार्स प्रदर्शनात "योहान पूनावाला" यांचा विशेष सत्कार  

या चित्रपटाचा भारतीय चित्रपटसृष्टीवर मोठा प्रभाव पडला आहे, इतका की अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारत भेटीदरम्यान DDLJ चा उल्लेख केला होता. यूकेमध्ये या चित्रपटाचे सांस्कृतिक महत्त्व आजही कायम आहे. याच चित्रपटावर आधारित Come Fall In Love – The DDLJ Musical हे नवीन संगीत नाटक 29 मे 2025 पासून मॅंचेस्टर ओपेरा हाऊसमध्ये सुरू होणार आहे. 140 दशलक्षांहून अधिक सोशल मीडिया फॉलोअर्स असलेले शाहरुख खान हे आजच्या काळातील सर्वात प्रिय अभिनेता आहेत.

DDLJ मधील शाहरुख खान आणि काजोल आता 'सीन्स इन द स्क्वायर'मध्ये आंतरराष्ट्रीय सिनेमा क्षेत्रातील दिग्गजांसोबत समाविष्ट होणार आहेत — मागील 100 वर्षांतील 10 अन्य आयकॉनिक पात्रांमध्ये हैरी पॉटर, लॉरेल और हार्डी, बग्स बनी, जीन केली (सिंगिंग इन रेन), मैरी पॉपिंस, मिस्टर बीन, पैडिंग्टन आणि DC सुपरहीरोज बैटमैन आणि वंडर वीमेन यांचा समावेश आहे.

हार्ट ऑफ लंडन बिझनेस अलायन्स चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मार्क विल्यम्स म्हणाले: "शाहरुख खान आणि काजोल या आंतरराष्ट्रीय चित्रपटजगतातील दिग्गजांना आमच्या ट्रेलमध्ये समाविष्ट करणे हा एक सन्मान आहे. DDLJ ही सर्वाधिक यशस्वी आणि महत्त्वपूर्ण बॉलिवूड चित्रपटांपैकी एक आहे. ही प्रतिमा केवळ बॉलिवूडच्या जागतिक लोकप्रियतेचे प्रतीक नाही, तर लंडनच्या सांस्कृतिक विविधतेचा उत्सवही आहे. आम्हाला खात्री आहे की जगभरातून चाहते लीसेस्टर स्क्वेअरमध्ये भेट देतील, जे चित्रपट आणि मनोरंजनाचे केंद्र आहे."

यशराज फिल्म्स चे सीईओ अक्षय विधानी, म्हणाले,"जेव्हा दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (DDLJ) 30 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला, तेव्हा त्याने भारतीय चित्रपटसृष्टीत क्रांती घडवली आणि प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. ही 'Scenes in the Square' मध्ये समाविष्ट होणारी पहिली भारतीय फिल्म ठरते, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. हा पुतळा DDLJ च्या 30 वर्षांच्या प्रवासाचा गौरव आहे आणि युकेमध्ये या चित्रपटाने साधलेला सांस्कृतिक प्रभाव अधोरेखित करतो. हा पुतळा भारतीय चित्रपटांचे आंतरराष्ट्रीय आकर्षण दर्शवतो आणि सिनेमा माध्यमातून समुदायांमध्ये मैत्री निर्माण करण्याचा प्रयत्न करतो."

000

Tags: DDLJ

About The Author

Advertisement

Latest News

विश्व हिंदू परिषद मावळ तालुका बजरंग दलाच्या वतीने वडगावात तहसिल कार्यालय मोर्चा विश्व हिंदू परिषद मावळ तालुका बजरंग दलाच्या वतीने वडगावात तहसिल कार्यालय मोर्चा
वडगाव मावळ/ प्रतिनिधी  पश्चिम बंगालमध्ये हिंदू समाजावर सातत्याने होणारे हल्ले, जाळपोळ, धार्मिक द्वेष भावना वाढविणारे प्रकार आणि शासन यंत्रणेचे अपयश...
फुले सिनेमा समाजप्रबोधन करणारा क्रांतिकारी सिनेमा ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
इंग्रजीला पालखी आणि हिंदीला विरोध हा कुठला विचार?
चाफेकर बंधुंचे स्मारक देशभक्तीचे संस्कार देणारे केंद्र
'भाषा शिकण्यावरून वाद हा रिकाम टेकड्यांचा उद्योग'
चाकणसह छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार टेस्लाचे उत्पादन
संग्राम थोपटे लवकरच होणार भाजपमध्ये डेरेदाखल

Advt