डॉ.शरद गोरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
संकल्प चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डॉ. वीणा खाडीलकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
पुणे: प्रतिनिधी
सुप्रसिध्द लेखक दिग्दर्शक व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक डॉ. शरद गोरे यांना संकल्प चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डॉ वीणा खाडीलकर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गेली ३२ वर्ष डॉ. गोरे यांनी साहित्य संवर्धनाचे उल्लेखनीय कार्य करून आजवर १८२ हून अधिक राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केले आहे. इतकी साहित्य संमेलने आयोजित करणारे ते साहित्यविश्वातील एकमेव व्यक्ती आहेत.
डॉ. गोरे यांनी ५ मराठी चित्रपट लेखक, दिग्दर्शक, संगीतकार व अभिनेता म्हणून केले आहेत. त्यांच्या 'एक प्रेरणादायी प्रवास: सूर्या' या चित्रपटाने फ्रान्स देशातील कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव व जर्मनीतील बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून पुरस्कार मिळवून आपली जागतिक स्तरावर मोहर उमटवली आहे. ते मध्यवर्ती भूमिकेत असलेला 'फुल टू हंगामा'. हा मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.

विविध विषयांवर आजवर दोन हजारांहून अधिक व्याख्याने डॉ. गोरे यांनी दिली आहेत. आपल्या अनोख्या वक्तृत्वशैलीसाठी ते विशेष परिचित आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर त्यांचा विशेष अभ्यास आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृतमध्ये लिहिलेल्या बुधभूषण या ऐतिहासिक ग्रंथाचा गोरे यांनी मराठीत काव्य अनुवाद केला आहे. तो रसिकांच्या ह्रदयावर अधिराज्य गाजवत आहे. विविध विषयांवर त्यांनी १० पेक्षा अधिक ग्रंथांचे लेखन केले आहे. ते स्वतः प्रकाशक व संपादक असलेल्या युंगधर प्रकाशन या संस्थेने १५० हून अधिक दर्जेदार पुस्तके प्रकाशित केली आहेत. अनेक नवोदित लेखक कवींना त्यांनी प्रोत्साहन दिले आहे.
डॉ. गोरे यांना मिळालेल्या या पुरस्कारासाठी समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.