सुट्टीचा उपयोग नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी करा : प्रा विजय नवले 

सुट्टीचा उपयोग नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी करा : प्रा विजय नवले 

वानवडी : "ज्ञान हीच शक्ती असून आधुनिक काळातील तंत्रज्ञान आत्मसात करा. AI  (ए आय ) मुळे नवीन करियर आणि नोकरी - व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील.  मोबाईलचा उपयोग गरजेपुरता आणि नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी करा. स्वभावानुसार करिअर निवडा व निवडलेल्या क्षेत्रात सर्वोच्च अभ्यास करा " असे प्रतिपादन करियर समुपदेशक प्रा विजय नवले यांनी केले.

विद्यार्थी व पालकांनी करियर विषयक  विचारलेल्या शंकांचे निरसन नवले यांनी केले. शासकीय एम एस - सी आय टी अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महात्मा ज्योतिराव फुले व  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पेस कम्प्युटर्स आणि स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान आयोजित करिअर व्याख्यानमालेत वानवडी येथील दिव्यांग संस्थेतील कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी फोर्स वन चे संचालक डीवायएसपी संतोष गायके, संस्थेचे कार्याध्यक्ष एड मुरलीधर कचरे, कार्यक्रम संयोजक पेस् कम्प्युटर्सचे संचालक व प्रतिष्ठानचे अध्यक्ष  दिनेश होले, स्पेक्ट्रम चे ऍड अमिताभ मेहता, दिपाली चुडेकर, सीमा चव्हाण, सचिन कदम, सुजित क्वाड्रास, आनंद रायकर, राजेंद्र कोंडेकर,  प्रतीक भुजबळ, युवराज मिरखलकर, प्रतीक भुजबळ,  लोकेश मंडेसा, सिकंदर शेख, प्रशांत मोरे उपस्थित होते.

WhatsApp Image 2025-04-21 at 2.01.26 PM

इंजीनियरिंग, मेडिकल, कॉमर्स, व्यवस्थापन, सैन्य दल, सोशल मीडिया, आय टी,  पेट्रोलियम, औषधी, विदेशी भाषा, कौन्सिलिंग, क्रीडा,  स्पर्धा परीक्षा, व्यवसाय यांसह अनेक करियर क्षेत्रांविषयी  त्यांनी संवाद साधला. प्रास्ताविक होले यांनी केले. सुत्र संचालन शैलेश सिन्नरकर यांनी केले. आभार अजित सुतार यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

हे पण वाचा  फुले सिनेमा समाजप्रबोधन करणारा क्रांतिकारी सिनेमा ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

000

About The Author

Advertisement

Latest News

Advt