शिवसेनेच्या वतीने जळीतग्रस्त कुटुंबांना मदत
सर्व 90 कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन
पुणे : प्रतिनिधी
चंदननगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत या कष्टकरी मोठ्या संख्येने राहत असलेल्या ठिकाणी बुधवार (ता. २३) रोजी पहाटे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत कुटुंबातील व्यक्तींच्या डोळ्यासमोर गृहपयोगी साहित्य जळून खाक झाले. अशा कुटुंबाना मदत करण्यासाठी काही दिवसापूर्वी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते आंनद गोयल यांच्या पुढाकाराने गृहउपयोगी साहित्याचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेना (एकनाथ शिंदे पक्ष) शहर प्रमुख नाना भानगिरे, चंदननगर वरिष्ठ निरीक्षक सीमा ठाकणे, शहर उपप्रमुख सुनील जाधव, निवृत्त वरिष्ठ निरीक्षक विलास सोंडे, आनंद गोयल, मनोज आग्रवाल, करण आग्रवाल, राजेश आग्रवल, रवी आग्रवाल, बाळा विश्वासराव, महेंद्र गायकवाड, गौतम वडवराव, विकी राऊळ, प्रदीप जाधव, शरद निकम, मनोहर जाधव उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहती लागलेल्या आगीत घरातील सर्व वस्तू जळून गेल्या यासाठी शिवसेनेच्या वतीने नित्याच्या वापरासाठी लागणारे साहित्य बकेट, मग, चटई, बेडशीट, कपड्याची पावडर, टूथ पेस्ट, आणि बिस्कीटाचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना नाना भानगिरे म्हणाले की, ज्या ९० घरांचे नुकसान झाले आहे. त्यांना पुन्हा निवारा बांधून देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात येईल. आणि त्या प्रत्येक कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयन्त करणार.
कार्यक्रमाचे आयोजन आनंद गोयल आणि चंदननगर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले होते.