बोपदेव घाटात इर्टिगा गाडी जळून खाक

बोपदेव घाटात इर्टिगा गाडी जळून खाक

कोंढवा :पुण्याहुन जेजूरीकडे जात असताना बोपदेव घाटाच्या वरच्या टप्यात इर्टिगा गाडीने अचानक पेट घेतला. या गाडीत असणारे चारही प्रवाशी ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे बालबाल बचावले. जळत असलेल्या गाडी पासून आवघ्या सात ते आठ फुटावर 22 टन डांबराने भरलेला डंपर बंद पडलेला उभा होता. त्याला लागलेली आग  लागली असती तर, अनर्थ घडला असता.
     

बोपदेव घाटाच्या शेवटच्या टप्यात मंगळवारी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास खासगी कंनीतील चार प्रवाशांना घेवून पुण्याहुन जेजूरीकडे जात असताना एम. एच. 12  टीएन 2738 या इर्टिगा गाडीने अचानक पेट घेतला. घाटातील चढाने गाडी चढत असताना गाडीच्या बोनट मधून अचानक धूर येताच, गाडीच्या चालकाने बसलेल्या प्रवाशांना गाडीच्या काचा खोलण्याच्या सुचना दिल्या व दरवाजे खोलण्यास सांगीतले गाडी थांबताच सर्व प्रवाशी व चालक बाजूला होताच काही क्षणात संपुर्ण गाडीने पेट घेतला. काचा व दरवाजे अगोदरच उघडले नसते तर, बोपदेव घाटात मोठा अनर्थ घडला असता. 
     

बोपदेव घाटात गेल्या चार दिवसांपासून 22 टन डांबर भरलेला एक डंपर बंद पडला आहे. त्या डंपर पासून आवघ्या सात ते आठ फुटावर इर्टिगा गाडी जळत होती. चूकन या डंपरला आग लागली असती तर, संपर्ण डोंगर परिसरात वणवा पेटला असता. सुदैवाने डंपरला आग लागली नाही. इर्टिगा गाडीतील चारही प्रवाशी वाचले यावेळी मोठी वाहतुक कोंडी बोपदेव घाटात झाली होती. कोंढवा वाहतुक शाखेच काँन्सटेबल प्रविण महामुनी यांनी वाहतुक कोंडी सोडविली. 

000

हे पण वाचा  सुट्टीचा उपयोग नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी करा : प्रा विजय नवले 

About The Author

Advertisement

Latest News

Advt