भारतात १९७० नंतर खंडित झालेली " एक देश एक निवडणूक " पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर

भारतात १९७० नंतर खंडित झालेली
मुंबई / रमेश औताडे 
 
देशभरात प्रत्येक राज्यातील वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या निवडणुकांचा परिणाम म्हणजे ४ लाख ५० हजार कोटी रुपये नुकसान करणे हा आहे. त्यासाठी " एक देश एक निवडणूक " घेतली तर देशाला आर्थिक लाभ होईल. असे सांगत एक देश एक निवडणुक केंद्रीय निवडणूक अभ्यास समिती अध्यक्ष खासदार पी. पी.चौधरी यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी सांगितले.
 
प्रत्येक राज्यांच्या निवडणुका घेणे व एक देश एक निवडणूक अशी प्रक्रिया राबवली तर काय परिणाम होतील. यासाठी देशभरातील आर्थिक संस्था यांनी आपापले अहवाल यावेळी समितीला दिले. यामध्ये नाबार्ड, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, युनियन बँक, एलआयसी अशा इतर बँकिंग आणि विमा क्षेत्रातील प्रमुख संस्था व इतर प्राधिकरणे सरकारला अहवाल दिला. 
 
देशभर अभ्यास दौरे करून चौधरी अध्यक्ष असलेली ही समिती संसदेला एक अंतिम अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर एक देश एक निवडणूक होईल असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. मुंबईतील भेटीत शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह खासदार धर्मेंद्र यादव, घनश्याम तिवारी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपचे संबित पात्रा, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.
 
प्रत्येक राज्यात वेवोवेळी होणाऱ्या निवडणुकांच्या आचारसंहितांमुळे
शिक्षक निवडणूक कामात गुंतला की विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो.शेतकरी कर्ज मंजूरी बँका थांबवतात. कर्ज मंजुरी, वितरण तसेच आर्थिक व्यवहारांना फटका बसतो. शिक्षक निवडणूक कामात गुंतला की विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो.याप्रकारे
कसा फटका बसतो याची माहिती दिली.
 
एकच निवडणूक खाली तर देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात १.६ टक्क्यांनी भर पडेल, असा अंदाज बँकांनी व्यक्त केल्याची माहिती चौधरी यांनी यावेळी दिली.
Tags:

About The Author

Advertisement

Latest News

'... तर मला सरळ फासावर लटकवा' '... तर मला सरळ फासावर लटकवा'
पुणे: प्रतिनिधी  हुंड्यासाठी छळ होत असल्याच्या कारणासाठी आत्महत्या करणाऱ्या वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विरोधकांकडून लक्ष्य...
न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स आणि स्टार इमेजिंग उभारणार वैद्यकीय तपासणी यंत्रणा
वैष्णवी आत्महत्या प्रकरणाची महिला आयोगाने घेतली दखल
'माझ्यामुळेच थांबले भारत पाकिस्तानातील युद्ध'
रिपब्लिकन पक्षातर्फे देशभर भारत जिंदाबाद यात्रा चे आयोजन
शहराचा सिमेंट काँक्रिटचा विकास होत असताना मंदिरासमोरील गोमाता पालिकेच्या कोंडवाड्यात
पुण्यात विविध ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी

Advt