काळविटाचे भूत पुन्हा सलमानच्या मानेवर

तब्बल २७ वर्ष जुन्या प्रकरणाची २८ जुलैला सुनावणी

काळविटाचे भूत पुन्हा सलमानच्या मानेवर

जयपूर: वृत्तसंस्था 

राजस्थानातील कथित शिकार प्रकरणी बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याच्या मानेवरील काळविटाचे भूत उतरायला काही तयार नाही. या प्रकरणामुळे बिश्नोई टोळी त्याच्या जीवावर उठली आहे तर दुसरीकडे या प्रकरणीच्या अपीलांची एकत्र सुनावणी २८ जुलैपासून सुरू होत आहे.. 

' हम साथ साथ है ' या चित्रपटाचे चित्रीकरण राजस्थानात सुरू असताना सलमान आणि त्याच्या सहकलारांकानी एका स्थानिकाच्या मदतीने काळविटाची शिकार केल्याप्रकरणी सलमानला सत्र न्यायालयाने ५ वर्षांची सजा सुनावली होती तर सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, नीलम, तब्बू आणि स्थानिक नागरिक दुष्यंत सिंग यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. 

या निकालाला सलमान, राजस्थान सरकार आणि बिश्नोई समाज यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. सलमानने शिक्षेच्या विरोधात तर सरकार व बिश्नोई समाजाने अन्य कलाकारांना निर्दोष मुक्त केल्याच्या विरोधात अपील केले आहे. या अपील अर्जांवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सर्व अर्जांची एकत्रित सुनावणी घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले. ही सुनावणी २८ जुलैपासून सुरू होणार आहे. 

हे पण वाचा  'पाकिस्तान सध्या प्रोबेशनवर, चुकून आगळीक केलीच तर...'

काळवीट या प्राण्याला बिश्नोई समाजात श्रद्धेचे आणि आपुलकीचे स्थान आहे. त्यामुळे बिश्नोई टोळीकडून सलमानला अनेकदा धमक्या देण्यात आल्या आहेत. त्याच्या घरावर गोळीबारही करण्यात आला. तसेच बिश्नोई टोळीचे मारेकरी सलमानची हत्या करण्यासाठी त्याच्या फार्म हाऊसच्या जवळ दबा धरून बसल्याचेही उघड झाले आहे. 

About The Author

Advertisement

Latest News

पाकिस्तानप्रमाणेच बीडमध्ये राबवा 'ऑपरेशन सिंदूर' पाकिस्तानप्रमाणेच बीडमध्ये राबवा 'ऑपरेशन सिंदूर'
मुंबई: प्रतिनिधी  सीमेपलीकडील दहशतवाद्यांप्रमाणेच राज्यातील बीड जिल्ह्यात अनेक 'अण्णा आणि आका' यांनी प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण केले असून त्यांच्या विरोधातही...
स्वबळ की महायुती? भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता
राज्यात या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता
काळविटाचे भूत पुन्हा सलमानच्या मानेवर
'ती'च्या आत्मसन्मानाची कथा सांगणार 'वामा: लढाई सन्मानाची’ 
'पाकिस्तान सध्या प्रोबेशनवर, चुकून आगळीक केलीच तर...'
'पाकिस्तानला नाणेनिधी कडून मिळणारी मदत का रोखली नाही?'

Advt