न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स आणि स्टार इमेजिंग उभारणार वैद्यकीय तपासणी यंत्रणा
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या इंटिग्रेटेड डायग्नोस्टिक नेटवर्कसाठी जॉईंट व्हेंचरची घोषणा
पुणे: प्रतिनिधी
महाराष्ट्र, 20 मे 2025: भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या डायग्नोस्टिक चेनपैकी एक असलेल्या न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स यांनी ऍडव्हान्स मेडिकल इमेजिंगमध्ये आघाडीवर असलेल्या स्टार इमेजिंगसोबत जॉईंट व्हेंचरची घोषणा केली आहे, ज्याद्वारे महाराष्ट्रभर ऍडव्हान्स पॅथॉलॉजी आणि ऍडव्हान्स रेडिओलॉजीच्या इंटिग्रेटेड डायग्नोस्टिक सेंटर्सची साखळी उभारण्यात येणार आहे.
13 वर्षांहून अधिक काळापासून, स्टार इमेजिंग पुण्यात नेक्स्ट जनरेशन रेडिओलॉजी टेक्नॉलॉजीचे प्रणेते राहिले आहेत. जागतिक कीर्तिमानप्राप्त रेडिओलॉजिस्ट डॉ. आशीष अत्रे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि ऑर्गन स्पेसिफिक तज्ञ असलेल्या कुशल रेडिओलॉजिस्टांच्या टीमच्या मदतीने स्टार इमेजिंग हे उच्च दर्जाच्या इमेजिंग सर्व्हिसेससाठी एक विश्वासार्ह नाव बनले आहे. सध्या स्टार इमेजिंग डेक्कन, बंड गार्डन रोड, वाकड, बाणेर (पुणे) आणि अकलूज येथे अत्याधुनिक, फुल्ली इंटिग्रेटेड डायग्नोस्टिक सेंटर्स चालवत आहे.
स्टार इमेजिंगचे डायरेक्टर आणि चीफ रेडिओलॉजिस्ट डॉ. आशीष अत्रे म्हणाले, “हे जॉईंट व्हेंचर आमच्या संस्थांसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील डायग्नोस्टिक क्षेत्रासाठी एक परिवर्तन घडवणारा टप्पा आहे. वैद्यकीय उत्कृष्टतेला एकत्र आणून आम्ही एक असे मजबूत आणि एकत्रित व्यासपीठ तयार करत आहोत जे आरोग्य तपासण्यांमध्ये नव्या मापदंडांची उभारणी करेल. रुग्ण आणि डॉक्टर्सना जलद, अचूक आणि एकत्रित निदान प्रदान करणे हे आमचे ध्येय आहे जेणेकरून आजारांची लवकर ओळख पटेल, योग्य उपचाराचा निर्णय घेता येईल आणि चांगले आरोग्य परिणाम मिळतील. आम्ही हे मॉडेल महाराष्ट्रभर विस्तारित करण्यास उत्सुक आहोत जेणेकरून प्रगत निदानाची सुविधा गरजूंपर्यंत पोहोचवता येईल.”
न्यूबर्ग डायग्नोस्टिक्सचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. जीएसके वेलू म्हणाले, “न्यूबर्ग डायग्नोस्टिक्समध्ये आमचे ध्येय नेहमीच वर्ल्ड क्लास डायग्नोस्टिक सेवा प्रत्येक व्यक्तीला मग कोणत्याही भूप्रदेशात राहणारा असो, परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे हे राहिले आहे. स्टार इमेजिंगसोबतचे हे जॉईंट व्हेंचर हे महाराष्ट्रात हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक महत्वाचे पाऊल आहे. पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी, वेलनेस आणि जीनोमिक्समधील आमच्या सामर्थ्यांना एकत्र करून आम्ही राज्यातील सर्वात कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स डायग्नोस्टिक नेटवर्क तयार करत आहोत. या भागीदारीद्वारे आम्ही डॉक्टरांना अधिक सखोल निदान मिळवून देऊ शकतो आणि रुग्णांसाठी उत्तम उपचारपरिणाम मिळवू शकतो.
महाराष्ट्र हे आमच्यासाठी व्यवसाय वाढीचे आणि इनोव्हेशनचे एक महत्वाची बाजारपेठ आहे आणि ही भागीदारी दीर्घकालीन गुंतवणूक, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि दर्जेदार आरोग्य तपासण्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भक्कम पाया ठरेल. या विस्तार धोरणाचा भाग म्हणून, आम्ही पुढील दोन वर्षांत पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या शहरांमध्ये नवीन इंटिग्रेटेड डायग्नोस्टिक सेंटर्स सुरू करण्याची योजना आखत आहोत.”
भारतामध्ये दीर्घकालीन आजारांचे वाढते प्रमाण, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेची वाढती गरज आणि क्लिनिकल निर्णय घेण्यामधील वाढती गुंतागुंत यामुळे इंटिग्रेटेड डायग्नोस्टिक सेवांची तीव्र गरज निर्माण झाली आहे. पूर्वी रेडिओलॉजी आणि पॅथॉलॉजी वेगवेगळ्या विभागांमध्ये कार्यरत असत, ज्यामुळे माहिती विखुरलेली राहत असे आणि निदान उशिरा होई. मात्र, रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी, वेलनेस आणि जीनोमिक्स यांसारख्या विविध निदान पद्धती एकाच छताखाली आणून, इंटिग्रेटेड डायग्नोस्टिक सेवा निदानाची अचूकता वाढवते, प्रक्रियेला गती देते आणि उपचारासाठी अधिक माहितीपूर्ण व योग्य वेळी निर्णय घेणे शक्य करते. हा मॉडेल भारतातील आरोग्य क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण लवकर हस्तक्षेप केल्यास आजाराचे वाढते प्रमाण मोठ्या प्रमाणावर रोखले जाऊ शकते आणि रुग्णांचे आरोग्य सुधारू शकते.
न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स आणि स्टार इमेजिंग यांची भागीदारी ही उणीव भरून काढते, कारण ती रुग्ण-केंद्रित आणि एकत्रित निदान सेवा पुरवण्यावर भर देते. न्यूबर्ग डायग्नोस्टिक्सच्या उपकंपनीमार्फत, डॉ. अजित गोळविलकर यांच्या कुटुंबाच्या सहकार्याने, एजी डायग्नोस्टिक्स पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रात पॅथॉलॉजी क्षेत्रातील आघाडीचा ब्रँड ठरला आहे. त्याचप्रमाणे, स्टार इमेजिंग पुण्यामधील रेडिओलॉजी क्षेत्रात आघाडीवर आहे. हे दोन्ही नामवंत आणि उच्च दर्जाचे ब्रँड्स एका छताखाली आणत, न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स पुणे आणि महाराष्ट्रात सर्वात मोठा आणि विश्वासार्ह इंटिग्रेटेड डायग्नोस्टिक ग्रुप म्हणून स्वतःची ओळख प्रस्थापित करत आहे.डॉ. अवंती गोळविलकर, डॉ. विनंती गोळविलकर,डॉ. अजय शाह आणि डॉ. कुनाल सहगल यांच्यासोबतच्या जॉईंट व्हेंचरद्वारे आणि डॉ. जय मेहता यांच्यासोबतच्या सहकार्याने सुरू केलेल्या ऑन्कोपॅथ सेंटर ऑफ एक्सलन्समुळे, न्यूबर्गने पुणे आणि ग्रेटर मुंबई परिसरात पॅथॉलॉजी क्षेत्रात एक भक्कम उपस्थिती निर्माण केली आहे.