वडगाव मावळ / प्रतिनिधी
पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षकपदी संदीप सिंग गिल्ल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची पदोन्नतीने अपर पोलीस आयुक्त पुणे शहर पदी नियुक्ती झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर संदीप सिंग गिल्ल यांची नियुक्ती करण्यात आली आहे
ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांची पुणे शहर पोलिस दलात पदोन्नतीने अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी बदली करण्याचे आदेश गृहविभागाने दिले आहेत.
परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त असलेले गिल यांची यापूवीं ग्रामीण पोलीस दलात अधीक्षकपदी बदली केली होती. मात्र, पोलिस अधीक्षक देशमुख यांचा कार्यकाळ पूर्ण न झाल्याने प्रशासकीय सेवा प्राधिकरणात
(मॅटमध्ये) धाव घेतली होती. त्यांनी कार्यकाळ पूर्ण करण्याची विनंती
केली होती. देशमुख यांनी कार्पूयकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांची बदली केली.त्यानंतर गिल यांना पोलिस उपायुक्तपदावरुन कार्यमुक्त करण्याचे आदेशज्ञपोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. त्यानुसार गिल हे सोमवारी (दि. १९) पुणे ग्रामीण पोलीस अधीककपदाची सुत्र स्वीकारणार आहेत.
संदीपसिंग गिल यांच्या नियोजनबद्ध, प्रभावी आणि लोकाभिमुख कामकाजामुळे पुणे ग्रामीण परिसरात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे, आधुनिक तांत्रिक उपाययोजना राबवणे आणि नागरिकांशी अधिक संवाद साधणारे पोलिसिंग सुरू राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
About The Author
