Vaishnavi Suicide Case '... तर मला सरळ फासावर लटकवा'
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी अजितदादांची संतप्त प्रतिक्रिया
पुणे: प्रतिनिधी
हुंड्यासाठी छळ होत असल्याच्या कारणासाठी आत्महत्या करणाऱ्या वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विरोधकांकडून लक्ष्य केले जात आहे. त्याबद्दल अजितदादांनी संतप्त प्रक्रिया व्यक्त केली आहे. मी कोणाच्या लग्नाला गेलो मी जर चूक असेल तर त्या चुकीसाठी मला फरसावर लटकवा, असे अजितदादा म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. हुंड्यासाठी तिचा छळ केला जात असल्याचा आरोपीच्या वडिलांनी केला आहे. वैष्णवी आणि शशांक हगवणे यांच्या विवाहाल. हुंडा म्हणून देण्यात आलेल्या फॉर्च्यूनर ची चावी अजित पवार यांच्या हस्ते शशांक यांच्याकडे देण्यात आली, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे..
या आरोपावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अजितदादा म्हणाले की, मला अनेकदा अनेक जणांकडून लग्नाचे आमंत्रण येते. जर मी त्या कार्याच्या ठिकाणी असलो तर काहीसा उशीर झाला तरी देखील मी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो. अशाप्रकारे लग्नाला उपस्थित राहणे हा जर माझा अपराध असेल तर त्याबद्दल मला फासावर लटकवा.
वैष्णवी यांच्या आत्महत्येनंतर हगवणे कुटुंबाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने हात वर केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि हगवणे कुटुंबाचा काहीही संबंध नसल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी या आत्महत्या प्रकरणाची स्वाधिकाराने दखल घेतली असून पोलिसांना तपास आणि कायदेशीर कारवाईचे निर्देश दिले आहेत.