मध्यमवर्गाला लवकरच मोठी भेट मिळण्याची शक्यता
अर्थसंकल्पात वाढू शकते आयकर मर्यादा
On
लवकरच सादर होणारा अर्थसंकल्प हा मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. या अर्थसंकल्पात सरकारकडून आयकर मर्यादा वाढवून मध्यमवर्गीयांना मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली: प्रतिनिधी
लवकरच सादर होणारा अर्थसंकल्प हा मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. या अर्थसंकल्पात सरकारकडून आयकर मर्यादा वाढवून मध्यमवर्गीयांना मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करतील. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार या अर्थसंकल्पात आयकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढविली जाण्याची शक्यता आहे. त्याचा लाभ मध्यमवर्गीय नोकरदार आणि छोटे व्यावसायिक यांना होणार आहे.
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यावर सादर केलेल्या पहिल्याच अर्थसंकल्पात करमुक्त उत्पन्नाची मर्यादा २ लाखावरून अडीच लाखांपर्यंत वाढविण्यात आली. त्यानंतर आतापर्यंत ९ वर्षात आयकर आकारणीच्या टप्प्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
या वर्षीचा अर्थसंकल्प मोदी सरकारचा या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प आहे. पुढील २०२४ हे सार्वत्रिक निवडणुकांचे वर्ष आहे. त्यामुळे आयकर मर्यादा वाढवून सरकार मध्यमवर्गीयांना खूश करण्याची शक्यता आहे. शिवाय सध्या वाढत्या महागाईमुळे बाजारपेठेत मागणीवर विपरीत परिणाम झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर करपात्र उत्पन्नाची मर्यादा वाढविल्यास मध्यमवर्गीयांच्या हातातील पैशात वाढ होऊन त्यामुळे बाजारपेठेत मागणी वाढण्याचीही शक्यता आहे.
Comment List