'स्वपक्षाला हरवण्याच्या कलेत राहुल गांधी तरबेज'

भाजप प्रवक्त्यांनी केली बोचरी टीका

'स्वपक्षाला हरवण्याच्या कलेत राहुल गांधी तरबेज'

नवी दिल्ली: प्रतिनिधी 

राहुल गांधी यांनी तब्बल नव्वद निवडणुकांमध्ये स्वतःच्याच पक्षाला पराभूत करण्याचा पराक्रम केला आहे. स्वपक्षाला हरविणे ही एक कला आहे. त्यात ते तरबेज आहेत. त्यामुळे राहुल गांधी हा भारतीय जनता पक्षासाठी हुकमी एक्का आहे, अशी उपरोधिक आणि बोचरी टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी केली आहे. 

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी गुजरात दौऱ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर बोलताना आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांबद्दल संशय व्यक्त केला. काँग्रेसचे कोण कोण कार्यकर्ते भाजपासाठी काम करतात, यावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता गांधी यांनी व्यक्त केली. गुजरात काँग्रेस मधला मोठा गट भाजपाशी हातमिळवणी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या या विधानावरून भाजपकडून तिखट प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 

राहुल गांधी यांनी प्रथम आत्मपरीक्षण करावे आणि आपण पक्षासाठी निरुपयोगी का ठरत आहोत, हे समजून घ्यावे. प्रत्यक्षात गांधी हे स्वतःकडे वळून बघण्याऐवजी आपल्या पराभवाचे खापर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, निवडणूक आयोग, मतदार यादी आणि आता स्वतःच्याच पक्ष कार्यकर्त्यांवर फोडत आहेत, असे पूनावाला म्हणाले.

हे पण वाचा  '... तर रशिया युक्रेन युद्ध झालेच नसते'

संवैधानिक संस्था, सरकार आणि माध्यमांवर सतत आरोप करणारे राहुल गांधी आता स्वतःच्या पक्ष कार्यकर्त्यांनाच उघडपणे बदनाम करू लागले आहेत. अशा प्रकारचे उदाहरण कुठेही बघायला मिळणार नाही. वास्तविक राहुल गांधी यांनी आत्मचिंतन केले तर त्यांना आढळून येईल की ते स्वतः पक्षाचे सर्वात वाईट नेते आहेत, अशा शब्दात राज्यसभा सदस्य सुधांशू त्रिवेदी यांनी गांधी यांच्यावर टीका केली. 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

पिंपरी - चिंचवड स्मार्ट सिटी आणि महापालिका इंटीग्रेटेड  सॉफ्टवेअर वर्षाअखेरीस कार्यान्वित पिंपरी - चिंचवड स्मार्ट सिटी आणि महापालिका इंटीग्रेटेड  सॉफ्टवेअर वर्षाअखेरीस कार्यान्वित
  मुंबई : स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार 50 टक्के आणि राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था प्रत्येकी 25 टक्के
'भारतातील जनता नाही तर नेतेच जातीयवादी'
'सुशांतसिंग राजपूतची हत्या नव्हे तर आत्महत्याच'
पुणेकरांचे प्रेम कधीही विसरू शकत नाही - अशोक सराफ
समाजाचा ढळलेला तोल सावरण्यासाठी श्री स्वामी समर्थांचे स्मरण आवश्यक!
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर पळून जाताना पोलीस झोपले होते का? : हर्षवर्धन सपकाळ
औंध रुग्णालयाच्या आवारात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारावे

Advt