'ट्रोलिंग हा सिनेसृष्टीतील नवा धंदा'

अभिनेत्री पूजा हेगडेने केली इंडस्ट्रीची पोलखोल

'ट्रोलिंग हा सिनेसृष्टीतील नवा धंदा'

मुंबई: प्रतिनिधी 

ऑनलाइन ट्रोलिंग हा केवळ गमतीचा किंवा प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा भाग राहिलेला नाही तर सिनेसृष्टीतील नवा धंदा बनला आहे. एखादी अभिनेत्री किंवा अभिनेत्याला बदनाम करण्यासाठी ट्रोलर्सना लाखो रुपये दिले जातात, अशा शब्दात अभिनेत्री पूजा हेगडे हिने सिने इंडस्ट्रीची पोलखोल केली आहे. 

आपले सौंदर्य आणि अभिनय क्षमतेच्या जोरावर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून बॉलीवूडपर्यंत आपल्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या पूजाला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. याबद्दलचा अनुभव तिने नुकताच एका मुलाखतीत कथन केला आहे. 

ट्रोलिंगचा सामना करण्यासाठी पूजा हिला एका व्यावसायिक संस्थेशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. या संस्थेने ट्रोलिंगला प्रत्युत्तर देण्यासाठी तिच्याकडे मोठ्या रकमेची मागणी केली. या संस्थेनेच आपल्याला पूजाला ट्रोल करण्यासाठी कोणाकडून तरी भरपूर पैसे देण्यात आले, असा खुलासा केल्याचेही पूजाने सांगितले. 

हे पण वाचा  ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये "क्षितिज 2024-25'' संपन्न

ट्रोलिंगकडे कितीही दुर्लक्ष करायचे ठरवले तरी देखील ही गोष्ट सोपी नाही. ट्रोलिंगचा परिणाम कौटुंबिक नातेसंबंधांवर देखील होत असतो. वर वर पाहता ट्रोल होणारी व्यक्ती, आपण मोठे स्थान प्राप्त केल्यामुळेच आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे सांगत इतरांची आणि स्वतःची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत असला तरी देखील त्याचा काही ना काही परिणाम हा त्या व्यक्तीच्या मनावर आणि त्याचबरोबर तिच्या जवळच्या लोकांवरही होतच असतो, असेही पूजा म्हणाली. 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

Advt