स्वमग्नता : योग्य वेळी योग्य उपचाराची गरज!
दर वर्षी २ एप्रिल हा दिवस जागतिक स्वमग्नता जागृती दिवस म्हणून साजरा केला जातो. स्वमग्नता कशी ओळखावी व त्यावरील उपचाराविषयी...
डॉ. जवाहरलाल शहा
स्वमग्नता (Autism) म्हणजे काय ?
स्वमग्नता हा मेंदूच्या विकासाशी संबंधित असलेला मेंदूचा एक विकार आहे. या मुलांना किंवा प्रौढांना सामाजिक संवाद साधण्यास अडचणी येतात. भाषा व संवाद कौशल्ये अविकसित असतात. कमी असतात. विशिष्ट वर्तन पद्धती वारंवार दिसतात. ही वैशिष्ट्ये लहानपणातच दिसू लागतात आणि प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या तीव्रतेने प्रकट होतात.
लहान मुलांमध्ये स्वमग्नता कशी ओळखावी ?
स्वमग्नतेची लक्षणे साधारणपणे २ ते ३ वर्षे वयाच्या आतच दिसू लागतात. मुलांच्या वर्तन, संवाद आणि सामाजिक कौशल्यांवर लक्ष ठेवून त्याचा अंदाज घेता येतो.
सामाजिक व संवाद कौशल्यांमध्ये अडथळे :
१. नजरेस नजर कमी देणे किंवा पूर्णतः टाळणे.
२. बोलण्यास उशीर किंवा संवाद कौशल्याचा अभाव केवळ हाताने
इशारे करणे.
३. आपल्या नावाला प्रतिसाद न देणे किंवा बोलावले तरी दुर्लक्ष करणे. ४. हसणे, रडणे, आनंद, राग यांसारख्या भावना ओळखायला त्रास होणे.
५. एकच शब्द, एकच वाक्य परत परत म्हणणे.
पुनरावृत्तीची वर्तन, पद्धती आणि मर्यादित आवड:
१. एकच हालचाल वारंवार करणे - हात हालवणे, शरीर हालवणे, गोल फिरणे.
२. ही मुले दररोजच्या सवयींमध्ये बदल सहन करू शकत नाही. उदा. कपडे विशिष्ट क्रमाने घालणे.
३. विशिष्ट वस्तू किंवा विषयांमध्ये घरातल्या व्यक्तीपेक्षा तीव्र रुची. उदा. ग्लास, पांघरूण एकाच गोष्टीत रमणे.
संवेदनशीलता आणि इंद्रिय संवेदना :
१. प्रकाश, आवाज किंवा स्पर्शाविषयी अती संवेदनशीलता
२. दुखापतीला असामान्य प्रतिक्रिया कधी वेदना जास्त जाणवतात तर कधी दुखापतीला कोणताच प्रतिसाद देत नाही.
सामाजिक संबंधाच्या पद्धती :
इतर मुलांमध्ये, नातेवाइकांमध्ये मिसळत नाहीत. मित्र बनवण्यास आणि सुसंवाद साधण्यास कमी पडतात.
स्वमग्नतेचे निदान कसे केले जाते?
पालक व शिक्षकांच्या मार्फत मुलाच्या सवयी, वागण्यात होणारे बदल यांसारख्या लक्षणांचा सविस्तर आढावा घेऊन, तसेच मुलाच्या संवाद आणि सामाजिक कौशल्यांचे निरीक्षण करून निदान केले जाते.
स्वमग्नता कशामुळे होते ?
बऱ्याच वेळा स्वमग्नतेचे कारण ज्ञात नसले, तरीही जनुकातील (genes) परिवर्तनामुळे अर्थात (genetic Mutation) सभोवतालच्या परिस्थितीमुळे स्वमग्नता होते. त्याचबरोबर गरोदरपणात आई किंवा वडिलांचे वय अधिक असल्यास स्वमग्नता होण्याचा धोका जास्त प्रमाणात असतो. आईला गरोदरपणात मानसिक आजारांसाठी मनोरुग्णाची औषधे सुरू असली, तरी स्वमग्नतेचा धोका वाढू शकतो.
स्वमग्न मुलाच्या डाव्या मेंदूचा विकास पूर्णपणे झालेला असतो. ही मुले मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे सर्जतेने वापरू शकतात; पण त्यांच्यात भावनिक विकास म्हणजेच उजव्या मेंदूचा विकास झालेला नसतो. त्यामुळे त्यांना परस्परांशी संवाद साधण्याची कला अवगत झालेली नसते.
स्वमग्नता हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो का?
स्वमग्नतेचे निदान योग्य वयात झाले आणि योग्य वेळी योग्य उपचार मिळाले, तर ते परस्परांशी संवाद साधू शकतात. इतर मुलांप्रमाणे चांगल्या प्रकारे अभ्यास करून आयुष्यात चमकदार कामगिरी करून यशस्वी होऊ शकतात.
स्वमग्न रुग्णांवर होमिओपॅथीने उपचार कसे केले जातात ?
होमिओपॅथीने उपचार करताना त्या आजाराचे मूळ कारण शोधले जाते. बाळ स्वमग्नतेने जन्माला येण्यामध्ये त्या बाळाचे आई-वडील जबाबदार नसतात, तर सभोवतालचे वातावरण याला कारणीभूत ठरते.
होमिओपॅथिक औषधाची निवड करताना त्या स्वमग्न मुलाचा मूळचा स्वभाव व त्या ९ महिन्यांत आईची असणारी विचारधारणा या बाबींवर लक्ष केंद्रित करून औषधयोजना केली जाते.
000