'व्यापाऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करा'

भाजप व्यापारी आघाडीची पोलिसांकडे मागणी

'व्यापाऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करा'

पुणे : प्रतिनिधी

शहरातील व्यापाऱ्यांना असामाजिक तत्वे, गुंड, स्थानिक मंडळ व कामगार संघटना यांच्या कडून वेगवेगळ्या प्रसंगी वर्गणी व युनियनच्या नावाखाली बळजबरीने पैशांची मागणी करण्यात येत आहे. या विषयात पोलिसांनी लक्ष घालावे आणि  कडक कारवाई करून त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी, पुणे शहर यांच्यावतीने करण्यात आली आहे. 

भाजप व्यापारी आघाडीच्या वतीने उमेश भाई शाह यांच्या नेतृत्वाखाली  सरचिटणीस महेश गुप्ता, उपाध्यक्ष विक्रम चव्हाण, अभिजीत भोसले  यांनी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे या संबंधीचे निवेदन दिले आहे.  

या निवेदनात म्हंटले आहे की,  देशाची अर्थव्यवस्था सुरळीत चालवण्यामध्ये व्यापारी वर्गाचा मोठा वाटा आहे. परंतु, वर नमूद केले प्रमाणे व्यापारी वर्ग ह्या असामाजिक तत्वे/गुंड व कामगार संघटना यांचा दबावाखाली मोठी रक्कम त्यांना देण्यास भाग पाडतात.

हे पण वाचा  खंडणी आणि खुनाबाबत प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा महत्त्वाचा जबाब

आम्ही भारतीय जनता पार्टी, व्यापारी आघाडी पुणे शहर तर्फे आपणास नम्र विनंती करतो की, आपण असामाजिक तत्वे, गुंड यांच्या विरोधात कडक कारवाई करून त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करावे. पोलीस - व्यापारी वर्ग यांच्यामधील संबंध मजबूत करण्यासाठी, संबंधित सर्व पोलिस स्टेशन व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना आप-आपल्या अधिकार क्षेत्रात असणाऱ्या असामाजिक तत्वे, गुंड यांना समज द्यावी.

About The Author

Advertisement

Latest News

Advt