वक्फ सुधारणा विधेयक राज्यसभेतही संमत

तब्बल बारा तासांच्या चर्चेनंतर विधेयकाला मंजुरी

वक्फ सुधारणा विधेयक राज्यसभेतही संमत

नवी दिल्ली: प्रतिनिधी

लोकसभेपाठोपाठ राज्यसभेत देखील वक्फ सुधारणा विधेयकाला मंजुरी देण्यात आली. राज्यसभेच्या 128 सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने तर 95 जणांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केले. तब्बल 12 तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर हे विधेयक राज्यसभेत संमत करण्यात आले. राष्ट्रपतींच्या संमतीनंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होऊन तो औपचारिकपणे लागू करण्यात येईल.

वक्फ बोर्डाच्या संपत्तीचे पारदर्शक व्यवस्थापन करण्यासाठी हे सुधारणा विधेयक सभागृहात मांडल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा आहे. मात्र, हे विधेयक म्हणजे अल्पसंख्याक समाजाच्या अधिकारांचे उल्लंघन असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सह सर्व पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राज्यसभेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकात विरोधकांकडून अनेक सुधारणा सुचविण्यात आल्या. मात्र, सत्ताधारी पक्षाने आवाजी मतदानाने या सर्व सुधारणा फेटाळून लावल्या. 

हे पण वाचा  'प्रसंगी जीव देऊ पण वक्फ कायद्यातील सुधारणा... '

हे विधेयक केवळ मुस्लिम समाजाला त्रास देण्यासाठी आणल्याचा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सभागृहात केला तर माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी या विधेयकाचे समर्थन केले. हे विधेयक मुस्लिम समाजातील गरिबांना त्यांच्या समाजातील श्रीमंतांकडून केल्या जाणाऱ्या पिळवणुकीपासून वाचवणारे आहे, असे ते म्हणाले. 

सत्ताधारी पक्षाचे सदस्य सुधांशु त्रिवेदी यांनी तर वक्फ बोर्डाच्या अस्तित्वावरच आक्षेप घेतला. इंडोनेशिया, तुर्कीए, सीरिया, इराक अशा मुस्लिम देशांमध्येच वक्फ अस्तित्वात नाही तर भारतात त्याची काय आवश्यकता, असा सवाल त्यांनी केला. वक्फ बोर्डाला जितके व्यापक अधिकार आहेत तसे अधिकार शीख, ख्रिश्चन, पारशी अशा अल्पसंख्य समाजाच्या संस्थांना आहेत का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

रामदास आठवले यांची कविता

वक्फ सुधारणा विधेयक हे क्रांतिकारी असून गरीब मुसलमानांच्या हिताचे असल्याचा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सभागृहात केला. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यापासून त्यांनी मुस्लिम समाजाचे हितासाठी अनेक निर्णय घेतल्याचेही ते म्हणाले. आपल्या भाषणात त्यांनी कविता देखील सादर केली. त्यात ते म्हणाले की,

इतनी हो गई है रात, मैं कर रहा हूं वक्त बर्बाद,

मैं दे रहा हूं मोदी जी को साथ, इसलिए कांग्रेस को मैं दिखा रहा हूं हाथ।

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

'प्रसंगी जीव देऊ पण वक्फ कायद्यातील सुधारणा... ' 'प्रसंगी जीव देऊ पण वक्फ कायद्यातील सुधारणा... '
नवी दिल्ली: प्रतिनिधी आपण प्रसंगी जीव देखील देऊ पण वक्फ कायद्यातील सुधारणा मान्य करणार नाही, असा इशारा सुधारणांना विरोध करणाऱ्या...
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाने देशभक्तीची ज्योत मनामनात प्रज्वलीत करणारे अभिनेते हरपले
'सजना'चे  मोहक पोस्टर आणि टिझर प्रेक्षकांच्या भेटीला
'मनसैनिकांवर कायदेशीर कारवाई करा'
भक्तिभावपूर्ण स्वरातील 'पांडुरंग' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे हृदयविकाराने निधन
वक्फ सुधारणा विधेयक राज्यसभेतही संमत

Advt