'मनसैनिकांवर कायदेशीर कारवाई करा'

बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

'मनसैनिकांवर कायदेशीर कारवाई करा'

पुणे: प्रतिनिधी

मराठी भाषेच्या वापराचा आग्रह धरतानाच बँक अधिकाऱ्यांना धमकावणाऱ्या आणि बँक शाखांमध्ये तोडफोड करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी आणि बँकांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजीव ताम्हाणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. 

बँकांमध्ये मराठी भाषेतून कारभार केला जात आहे की नाही, याची खातरजमा करून घ्या आणि त्यासाठी बँक अधिकाऱ्यांकडे आग्रह धरा, असे आदेश मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत मनसैनिकांना दिले होते. त्यानंतर विशेषतः ठाणे आणि पुणे येथील राष्ट्रीयिकृत बँकांच्या शाखांमध्ये जाऊन मनसैनिकांनी मराठी भाषेच्या वापराचा आग्रह धरला. त्यावेळी काही शाखांमध्ये धमकावणीचे व तोडफोडीचे प्रकार झाल्याचा महाराष्ट्र बँकेतील अधिकाऱ्यांच्या संघटनेचा आरोप आहे. 

ताम्हणे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात अनेक प्रकारच्या मागण्या केल्या आहेत. बँकेत जाऊन अधिकाऱ्यांना धमकावणाऱ्या व हल्ले करणाऱ्या मनसैनिकांवर कठोर कारवाई करा. स्थानिक पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांना बँक कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे तसेच बँकांची मालमत्ता सुरक्षित राखण्याचे आदेश देण्यात यावेत. अशा धमक्या दिले गेलेले बँक कर्मचारी आणि अधिकारी सुरक्षित राहावे त्यासाठी पावले उचलण्याचे आदेश बँकांचे व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी संचालक, विभागीय व्यवस्थापक यांच्यासह बँक व्यवस्थापनाला देण्यात यावे, अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत. 

हे पण वाचा  महार रेजिमेंटच्या मुख्यालयात उभारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा!

या मागण्यांची पूर्तता न झाल्यास संपाचा इशारा देखील बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशन या संघटनेने दिला आहे. 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

मंगेशकर रुग्णालयाचा 'बैल गेला अन् झोपा केला' मंगेशकर रुग्णालयाचा 'बैल गेला अन् झोपा केला'
पुणे: प्रतिनिधी यापुढे प्रसूतीसाठी किंवा तातडीच्या उपचारांसाठी आलेल्या कोणत्याही रुग्णांकडून अनामत रक्कम न घेण्याचा निर्णय दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विश्वस्त मंडळाने...
'नियम न पाळणाऱ्या रुग्णालयांची जागा ताब्यात घ्या'
'प्रसंगी जीव देऊ पण वक्फ कायद्यातील सुधारणा... '
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाने देशभक्तीची ज्योत मनामनात प्रज्वलीत करणारे अभिनेते हरपले
'सजना'चे  मोहक पोस्टर आणि टिझर प्रेक्षकांच्या भेटीला
'मनसैनिकांवर कायदेशीर कारवाई करा'
भक्तिभावपूर्ण स्वरातील 'पांडुरंग' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

Advt