कराड येथे नवोदित साहित्य संमेलनाचे आयोजन

शरद पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन

कराड येथे नवोदित साहित्य संमेलनाचे आयोजन

कराड: प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ३१ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन ९ व १० मे  २०२५ रोजी कराड संपन्न होणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन लोकनेते शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते होणार असल्याची घोषणा आज साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांनी केली. ग्रंथदिंडी, उद्घाटन समारंभ, परिसंवाद, चर्चासत्र, कथाकथन, कविसंमेलन असा भरगच्च कार्यक्रम होणार असून या संमेलनात देशभरातील ९०० साहित्यिक उपस्थित राहणार आहेत.

यापूर्वी पुणे, मुंबई, नांदेड, उदगीर, तुळजापूर, लातूर, धाराशिव, वणी, रत्नागिरी, गोंदिया, शेवगाव, बारामती, मंठा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर याठिकाणी संपन्न झाले होते. नारायण सुर्वे, मंगेश पाडगांवकर, द.मा. मिराजदार, शिवाजी सावंत, सुरेश भट, केशव मेश्राम, विश्वास पाटील, सुवर्णा पवार, श्रीपाल सबनीस, म.दा.हातकणगलेकर, गंगाधर पाणतावणे, जनार्दन वाघमारे, आ.ह.साळुंखे, आदी मान्यवर साहित्यिकांनी या संमेलानाचे संमेलनाध्यक्षपद भूषिवले आहे. तर डॉ.डी.वाय.पाटील, बी.जी.शिर्के, उदय सामंत, सुधीर तांबे, प्रा.शिवाजीराव सावंत, यासारख्या दिग्गजांनी स्वागताध्यक्षपद भूषिवले आहे. जावेद अख्तर, पु.ल.देशपांडे, रमाकांत खलप या मान्यवरांनी संमेलनाचे उद्घाटन केले आहे. 

या पत्रकार परिषदेत साहित्य परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष 
 डॉ. नितीन नाळे, कोल्हापूर विभागीय अध्यक्ष विकास भोसले, सातारा जिल्हा अध्यक्ष संदीप पवार, महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ.हनुमंत चिकणे, कराड तालुका अध्यक्ष  डॉ. शंकरराव खापे, कराड तालुका उपाध्यक्ष डॉ.दादाराम साळुंखे, कराड तालुका सचिव प्रकाश पिसाळ, किशोर पाटील, मानसिंग पाटील, वामन अवसरे, सुशील कांबळे, रामचंद्र पाटील, विजय कोळेकर, विद्या पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

हे पण वाचा  'उर्दूला मुस्लिमांची भाषा मानणे हा वास्तवाचा विपर्यास'

About The Author

Advertisement

Latest News

 चाफेकर बंधुंचे स्मारक देशभक्तीचे संस्कार देणारे केंद्र चाफेकर बंधुंचे स्मारक देशभक्तीचे संस्कार देणारे केंद्र
चिंचवड येथील क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे लोकार्पण  पिंपरी: प्रतिनिधी 'हुतात्मांच्या कार्यातून देशभक्तीची प्रेरणा मिळत असते. चापेकर बंधु अशाच हुतात्मांपैकी एक होते....
'भाषा शिकण्यावरून वाद हा रिकाम टेकड्यांचा उद्योग'
चाकणसह छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार टेस्लाचे उत्पादन
संग्राम थोपटे लवकरच होणार भाजपमध्ये डेरेदाखल
'... ही मागणी पांडुरंगाकडे करण्याचे कारणच नाही'
'वी द पीपल;'ने जागवल्या बहुजन महानायकांच्या स्मृती
माळशिरस तालुक्यात संपणार पाण्याचा वनवास

Advt