अनोख्या पद्धतीने मिळालेल्या श्रीराम मूर्तीच्या पूजनाने जन्मोत्सव साजरा*

केतकी देशपांडे कुटुंबीयांची  मंत्रमुग्ध करणारी कहाणी 

अनोख्या पद्धतीने मिळालेल्या श्रीराम मूर्तीच्या पूजनाने जन्मोत्सव साजरा*

पुणे: प्रतिनिधी

केतकी देशपांडे कुटुंबीय ,अपूर्व सोनटक्के, बाळासाहेब गिरम ,सुनील पांडे  या श्रीराम भक्तांच्या पुढाकारातून दामले सभागृह विधी  रस्ता येथे श्रीराम जन्माचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने गीतरामायणासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले. 

वृंदा बाम यांच्यासह त्यांच्या स्वरतरंग संगीत विद्यालय या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात गीत रामायण सादर केले. त्याचप्रमाणे राष्ट्रसेविका समिती प्रभावी शाखेच्या वतीने रामरक्षा पठण आणि राम नाम जपाचे आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे कुंदा पानसे यांच्या नेतृत्वाखाली ईशभक्ती भजनी मंडळाने भक्ती गीते सादर केली. केतकी देशपांडे अपूर्व सोनटक्के, बाळासाहेब गिरम, सुनील पांडे, आदींनी या अनोख्या सोहळ्याचे आयोजन केले होते.    

रंजना  नाईक, प्रिया रानडे, सुवर्णा ऋषी,योगेश जोगळेकर या रामभक्तांनी मनोभावे सेवा केली .

हे पण वाचा  'मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागणे हाच मोठा गुन्हा'

श्री महाराज यांची निस्सिम भक्ती करणाऱ्या केतकी देशपांडे कुटुंबिय यांना कुमठेकर रस्त्यावरील एका गणेशोत्सव मंडळाने सादर केलेल्या देखाव्यातील श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मूर्ती अनपेक्षितपणे प्राप्त झाल्या. हा श्री गोंदवलेकर महाराज यांचा प्रसाद असल्याचे मानून केतकी देशपांडे  कुटुंबीयांनी या मूर्तींचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला. आपले घर हेच एक मंदिर होऊन जावे, अशी देशपांडे  यांची भावना आहे. त्याच दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू आहे. या वाटचालीत त्यांना अनेक श्रीराम भक्तांची साथ आहे.

About The Author

Advertisement

Latest News

इंग्रजीला पालखी आणि हिंदीला विरोध हा कुठला विचार? इंग्रजीला पालखी आणि हिंदीला विरोध हा कुठला विचार?
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील शाळांमध्ये मराठीप्रमाणेच हिंदी शिकण्याची सक्ती करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेप्रमाणेच अनेक साहित्यिकांनी देखील विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर...
चाफेकर बंधुंचे स्मारक देशभक्तीचे संस्कार देणारे केंद्र
'भाषा शिकण्यावरून वाद हा रिकाम टेकड्यांचा उद्योग'
चाकणसह छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार टेस्लाचे उत्पादन
संग्राम थोपटे लवकरच होणार भाजपमध्ये डेरेदाखल
'... ही मागणी पांडुरंगाकडे करण्याचे कारणच नाही'
'वी द पीपल;'ने जागवल्या बहुजन महानायकांच्या स्मृती

Advt