तरुण पिढीने महापुरुषांचे स्थळांना भेट देऊन प्रेरणा व ऊर्जा घेऊन व्यसनापासून दूर रहावे- ढोक
फुले जयंती दिनी फुले एज्युकेशन तर्फे समस्त ग्रामस्थ चऱ्होली बुद्रुक सन्मानित
पुणे - थोर समाज सुधारक महात्मा फुले यांच्या 198 व्या जयंती निमित्ताने फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशन तर्फे फुले जयंती दिनी पहाटे 6वाजता समस्त ग्रामस्थ आणि सावता माळी मंडळ , चऱ्होली बुद्रुक पदाधिकारी कार्यकर्ते यांचा अध्यक्ष व महात्मा फुले चरित्र साधने साहित्य व प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन सदस्य सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते दरवर्षी महात्मा फुले जयंतीनिमित्त फुले वाडा ते चऱ्होली पायी मशाल ज्योत नेऊन गावात भव्य मिरवणूक काढून गुणवंत व उच्चशिक्षित, UPSC,, MPSC, पास विद्यार्थी, पालक यांचा सत्कार सोहळा , मर्दानी खेळ, सोबत समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजित करतात म्हणून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे अर्ध पुतळे भेट देऊन सन्मान केला.
यावेळी सत्यशोधक ढोक म्हणाले की नवीन पिढीने व्यसनाचे आहारी न जाता महापुरुषांचे जयंती,पुण्यतिथी दिनी फुले वाड्यासारखे स्थळांना भेट देऊन त्यांची प्रेरणा ,ऊर्जा घेऊन सामाजिक कार्य करावे ,फुले दाम्पत्य यांनी विविध प्रकारचे कार्य करून आपल्याला दिशा दिली आहे त्याच दिशेने म्हणा वाटेने काम केले तरी आत्मिक व देश सेवा केल्याचे समाधान मिळेल म्हंटले आणि आपण सर्वजण याच दिशेने कायम कार्य करीत असतात हे मी प्रत्यक्ष स्वतः डोळ्याने पाहिले आहे. आपण या सोबत आधुनिक काळाची गरज म्हणून सत्यशोधक विवाह देखील लावावेत त्यासाठी आमची संस्था विधी कार्य मोफत करेल असे देखील म्हटले.
कार्यक्रमाचे सुरुवातीला वाड्यातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व मशाल ज्योत प्रज्वलीत सत्यशोधक ढोक यांचे हस्ते केली आणि संपूर्ण फुले वाड्याला मशाल ज्योती ने महापुरुषांचे नावे जयघोष करीत शेवटी ढोक यांचे पाठोपाठ सत्याचा अखंड सर्वांनी म्हंटला.
000