'संवैधानिक कर्तव्यपूर्ती हीच बाबासाहेबांना आदरांजली'
काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांचे प्रतिपादन
On
पुणे: प्रतिनिधी
प्रत्येकास समान मताचा अधिकार देणारे संविधान हीच भारताची ओळख असून संविधानाचे मूल्य जपले तरच खऱ्या अर्थाने श्रेष्ठ भारत, आत्मनिर्भर भारत होऊ शकतो. संवैधानिक मूल्यांची व देशाच्या स्वायत्त संस्थांची पायमल्ली रोखत देशाची वाटचाल ‘संविधानाधारित’ होण्याकडे लक्ष ठेवणे, हे विरोधी पक्षांचे कर्तव्य असून सत्ताधारी व विरोधी पक्षांची संवैधानिक कर्तव्यपूर्ती ही डॅा बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी अभिवादनपर कार्यक्रमात बोलतांना केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस लिगल विभागाच्या वतीने महामानव, भारतरत्न डॅा बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी महापालिका भवनातील डॅा आंबेडकरांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजक सरचिटणीस ॲड फैयाझ शेख यांनी स्वागत - प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष ॲड शहीद अख्तर यांनी मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी ॲड श्रीकांत पाटील, ॲड सुरेश नांगरे, ॲड बाळासाहेब बामणे, ॲड विजय तिकोणे, ॲड अतुल गुंड पाटील, ॲड राजाभाऊ चांदेरे, ॲड इराफन शेख, ॲड सुरेश देवकर, ॲड आलीस सय्यद, इंटकचे मनोहर गाडेकर, जेष्ठ काँग्रेसजन सुरेश नांगरे, सुभाष जेधे, गणेश शिंदे, धनंजय भिलारे, विना कदम, अनिल धिमधीमे, विक्रांत धोत्रे इ उपस्थित होते…
या प्रसंगी संविधान प्रतींचे वाटप व सामूहीक वाचन करण्यात आले.
विविध धर्मिय स्वातंत्र्य सेनानींच्या प्रदीर्घ ब्रिटीश विरोधी लढ्यामुळे, बलिदानामुळे भारत लोकशाही प्रणीत प्रजासत्ताक देश म्हणून जगासमोर उभा राहिला. स्वातंत्र्याकरता केलेल्या बलिदानाचे महत्व लक्षांत घेता भविष्याची काळजी वहात ‘भारतीय संविधानाप्रति’ जागरूक राहून, भारतीय घटनेचे रक्षण करणे हे भारतीय नागरिकाचे देशाप्रती कर्तव्य ठरणार आहे. संवैधानिक लोकशाहीत जागरुक नागरिकच त्याच्या भविष्याचा शिल्पकार असून भारताची संविधानाधारीत वाटचालीवर पहारा ठेवणे हीच खऱ्या अर्थाने डॅा बाबासाहेबांना आदरांजली ठरेल,” अशा भावना उपस्थित्यांनी व्यक्त केल्या. ॲड राजेंद्र काळेबेरे यांनी आभार प्रदर्शन यांनी केले.
About The Author
Latest News
19 Apr 2025 17:15:12
वडगाव मावळ/ प्रतिनिधी
पश्चिम बंगालमध्ये हिंदू समाजावर सातत्याने होणारे हल्ले, जाळपोळ, धार्मिक द्वेष भावना वाढविणारे प्रकार आणि शासन यंत्रणेचे अपयश...