माळशिरस तालुक्यात संपणार पाण्याचा वनवास

माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रयत्नांना यश

माळशिरस तालुक्यात संपणार पाण्याचा वनवास

माळशिरस: प्रतिनिधी

बुधवार दि 16 एप्रिल रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत माळशिरस तालुक्यातील 22 गावांच्या पाणी प्रश्न संदर्भात माळशिरसचे मा आ राम सातपुते यांनी मंत्रालयात जिल्ह्याचे पालकमंत्री ना जयकुमार गोरे मा खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समवेत  बैठक आयोजित केली होती या बैठकीत माळशिरस तालुक्यातील 22 गावांना लवकरच नीरा देवघर चे पाणी मिळणार असून या गावांचा वनवास संपेल असे राज्याचे जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी अश्वस्थ केल्याने पिढ्यानपिढ्या दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या 22 गावांसह माळशिरस तालुक्यातील जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे

माळशिरस तालुक्यातील निरा उजव्या कालव्यापासून वंचित असणारे 22 गावे यामध्ये कोथळे, कारुंडे, पिंपरी, फडतरी, लोंढे मोहितेवाडी, लोणंद, गिरवी, भांब ,रेडे, कन्हेर ,मानकी, इस्लामपूर, गोरडवाडी, गारवड ,मगरवाडी, पठाणवस्ती ,तरंगफळ सुळेवाडी, शिंगोर्णी, बचेरी ,जळभावी आदी गावे कायमच दुष्काळी गावे म्हणून ओळखली जातात परंतु माढा लोकसभा मतदारसंघाचे मा खा रणजीतसिंह नाईक निंबाळकर व माळशिरसचे मा आ राम सातपुते यांनी सातत्याने या 22 गावांना नीरा देवघर चे पाणी मिळावे यासाठी प्रयत्न केले काही तांत्रिक अडचणीमुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडत होती परंतु बुधवारी मा आ राम सातपुते यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री, मा खा रणजितसिंह नाईक निंबाळकर व स्वतः बैठकीस उपस्थित राहून यावर मार्ग काढला असून लवकरच या 22 गावांना पाणी मिळणार आहे या बैठकीसाठी जलसंपदा मंत्र्यासह जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव, कार्यकारी संचालक तसेच प्रमुख अधिकारी उपस्थित होते

दुष्काळी कलंक पुसणार

हे पण वाचा  'शब्दांचे गारुड किती पसरावे याचे भान कवीला आवश्यक'

नीरा उजव्या कालव्यापासून वंचित असणाऱ्या माळशिरस तालुक्यातील 22 गावाकडे दुष्काळी गावे म्हणून सातत्याने पाहिले जात होते या गावातील नागरिक मुंबई पुणे यासारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये कामानिमित्त स्थलांतरित होत होते या ठिकाणी कमालीचे दारिद्र्य वास्तव करीत होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री ना जयकुमार गोरे, मा खा रणजीतसिंह नाईक निंबाळकर व मा आ राम सातपुते यांच्या प्रयत्नातून 22 गावांच्या कपाळी असणारा दुष्काळी कलंक पुसणार आहे .

    महादेव पवार, शेतकरी इस्लामपूर



About The Author

Advertisement

Latest News

विश्व हिंदू परिषद मावळ तालुका बजरंग दलाच्या वतीने वडगावात तहसिल कार्यालय मोर्चा विश्व हिंदू परिषद मावळ तालुका बजरंग दलाच्या वतीने वडगावात तहसिल कार्यालय मोर्चा
वडगाव मावळ/ प्रतिनिधी  पश्चिम बंगालमध्ये हिंदू समाजावर सातत्याने होणारे हल्ले, जाळपोळ, धार्मिक द्वेष भावना वाढविणारे प्रकार आणि शासन यंत्रणेचे अपयश...
फुले सिनेमा समाजप्रबोधन करणारा क्रांतिकारी सिनेमा ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
इंग्रजीला पालखी आणि हिंदीला विरोध हा कुठला विचार?
चाफेकर बंधुंचे स्मारक देशभक्तीचे संस्कार देणारे केंद्र
'भाषा शिकण्यावरून वाद हा रिकाम टेकड्यांचा उद्योग'
चाकणसह छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार टेस्लाचे उत्पादन
संग्राम थोपटे लवकरच होणार भाजपमध्ये डेरेदाखल

Advt