राष्ट्रीय ओबीसी महासंघाची केंद्रीय बैठक पुणे येथे २७ एप्रील ला होणार!

राष्ट्रीय ओबीसी महासंघाची केंद्रीय बैठक पुणे येथे २७ एप्रील ला होणार!

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे १०वे राष्ट्रीय अधिवेशन गोवा राज्यात होऊ घातले आहे. तसेच ओबीसी महासंघाच्या संघटनात्मक रचना व राज्य , केंद्राकडून प्रलंबित असलेल्या मागण्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी दि. २७ एप्रिल ला पत्रकार भवन पुणे येथे सकाळी १० ते १ या वेळात एक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला  राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे, महासचिव सचीन राजुरकर, इत्यादी नेते मार्गदर्शन करणार आहेत.सभेमध्ये राज्यातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनां तसेच राष्ट्रीय पदाधिकार्यांनां आमंत्रित केले आहे.  

या बैठकीत  ओबीसी समाजाची जनगणना, आरक्षणाची मर्यादा ५०%च्या वर नेण्यात यावी, क्रिमीलेयरची ची मर्यादा १५लाख रु करण्यात यावी, केंद्रात ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी. राज्यातील अनेक योजनामधील ओबीसी विद्यार्थ्यांना अजुन पर्यंत थकीत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली नाही.ओबीसी वस्तीगृहाच्या  निधीचे वाटप हे सर्व विषय चर्चेला येणार आहेत. या सर्व मागण्या संदर्भात सरकारला स्मरणपत्र अथवा राज्यस्तरीय आंदोलन या विषयावर चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी या सभेचे आयोजन केले आहे.असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे केंद्रीय सहसचिव शरद वानखेडे यांनी कळविले आहे.

000

About The Author

Advertisement

Latest News

Advt