भारतीय विद्यार्थ्यांची जागतिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी

रोबोटिक वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जिंकले इंजीनियरिंग इंस्पिरेशन अवॉर्ड

भारतीय विद्यार्थ्यांची जागतिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी

पुणे: प्रतिनिधी

भारतीय STEM शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक ठरलेल्या क्षणात, Team R Factor 6024 या मुंबईस्थित विद्यार्थी-रोबोटिक्स टीमने FIRST Robotics World Championship 2025 मध्ये Engineering Inspiration Award जिंकत भारतासाठी एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

या प्रतिष्ठेच्या जागतिक स्पर्धेचे आयोजन १६ ते १९ एप्रिल दरम्यान ह्युस्टन, अमेरिका येथे करण्यात आले होते. जवळपास ३० देशांतील ६०० हून अधिक उच्च माध्यमिक टीम्स यात सहभागी होत्या.

भारतासाठी पहिले पदक

हे पण वाचा  '... ही दोन धर्मांची नव्हे तर धर्म आणि अधर्माची लढाई'

अभियांत्रिकी प्रेरणा पुरस्कार ही स्पर्धेतील एक सर्वात मानाची आणि प्रतिष्ठित पारितोषिकांपैकी एक आहे. हे पारितोषिक अशा टीम्सना दिले जाते, ज्या आपल्या शाळा आणि समाजामध्ये अभियांत्रिकी आणि STEM (Science, Technology, Engineering, Mathematics) विषयांबाबत सक्रिय जनजागृती घडवतात.

टीम आर फॅक्टर ला हा सन्मान Johnson Division मध्ये मिळाला. परीक्षकांनी त्यांच्या सामाजिक परिणामकारकतेचं, ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी STEM संधी निर्माण करण्याच्या प्रयत्नाचं विशेष कौतुक केलं. Team R Factor ही भारतातील पहिली FIRST Robotics Competition (FRC) टीम असून, त्यांच्या नावावर ६ जागतिक स्पर्धा व ४ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची यशस्वी नोंद आहे.

“ही टीम केवळ एक रोबोटिक्स टीम नाही. ही एक चळवळ आहे. त्यांनी ग्रामीण भारतातील विद्यार्थ्यांसाठी संधी निर्माण केली, अभियांत्रिकी शिक्षणाची नवी दृष्टी दिली. ते तयार करतात, कोड करतात, शिकवतात आणि समाजात बदल घडवतात. ह्या टीममध्ये आहे STARRRRR फॅक्टर!” अशी भावना परीक्षकांनी व्यक्त केली. 

या वर्षीच्या मोसमात ‘The Goldfish’ या नावाच्या रोबोटने त्यांच्या कामगिरीचा केंद्रबिंदू ठरला. संपूर्ण रोबोट डिझाईन, बांधकाम, वायरिंग आणि प्रोग्रामिंग विद्यार्थ्यांनी स्वतः केलं, कोणतीही व्यावसायिक मदत न घेता. टीम आर फॅक्टर सध्या नवीन औद्योगिक, शैक्षणिक व CSR भागीदाऱ्यांसोबत सहयोग करण्यासाठी सज्ज आहे. 

 एकात्मिक राष्ट्रीय सहभाग

टीममध्ये १९ विद्यार्थी असून, ते ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूल, मुंबई , PACE कनिष्ठ महाविद्यालय, मुंबई, डीएसबी इंटरनॅशनल स्कूल, मुंबई, व्हीआयटी, पुणे, शारदा मंदिर शाळा, गोवा, कॅथेड्रल आणि जॉन कॉनन, विट्टी, जमनाबाई नरसी, सिंगापूर इंटरनॅशनल स्कूल, एएसयू प्रीप येथे ग्लोबल अकादमी या शाळांमधील आहेत. 


शिक्षणापलीकडे STEM साठी सामाजिक चळवळ

Team R Factor ही केवळ स्पर्धात्मक टीम नसून एक सामाजिक चळवळ आहे. त्यांनी गोवा सरकारशी भागीदारी करत STEM शिक्षण सरकारी शाळांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी

Automation Expo मध्ये ८००+ कंपन्यांशी संवाद साधला

इंजिनिअरिंग कॉलेज फेस्ट्स मध्ये कार्यशाळा घेतल्या

InfinityX STEM Foundation सोबत भारतभर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न केले. 

About The Author

Advertisement

Latest News

Advt