माई रमाईचे वरळी स्मशानभूमीत राष्ट्रीय स्मारकाची उभारा

माई रमाईचे वरळी स्मशानभूमीत राष्ट्रीय स्मारकाची उभारा
मुंबई / रमेश औताडे 
 
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे सावली बनून उभी राहणाऱ्या  माई रमाई यांचे वरळी स्मशानभूमीत राष्ट्रीय स्मारकाची पाय उभारणी करणार की नाही ? असा सवाल आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी शासनाला केला आहे.
 
येत्या २७ मे रोजी माई रमाई यांची पुण्यतिथी निमित्त तरी शासनाने घोषणा करावी. राज्य शासनाने नुकतीच अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकासाठी मोठी निधी घोषित केली आम्हाला आनंद झाला आम्ही साखर वाटून तोंड गोड केले. याच धर्तीवर माई रमाई यांच्या स्मारकासाठी कधी घोषणा होईल या साठी मोठ्या आतुरतेने आंबेडकरी, पुरोगामी समाज वाट बघत आहे असे बागडे यांनी सांगितले 
 
मागिल कित्येक वर्षांपासून वरळी स्मशानभूमी येथे माई रमाईचे स्मारक झाले पाहिजे या करिता आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा सह विविध संघटना प्रयत्न करत आहेत. आमच्यातले कित्येक नेते शासनाच्या दारात मांडवली करून बसले आहेत  हि मोठी शोकांतिका आहे असे बागडे यांनी सांगितले. 
 
आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे वरली स्मशानभूमीला माईचे नाव तर मिळाले परंतु स्मारकाचे आराखडे अजून तयार झाले नाहीत. हे भिजत घोंगडे का आहे ? या साठी  राज्यभरात झंझावात करून हा प्रश्न लवकर कशा मार्गी लागावा साठी २७ मे पासून अभियानाचा प्रारंभ वरळी स्मशानभूमीत माईला अभिवादन करून प्रारंभ करण्यात येणार आहे असे बागडे यांनी माध्यमांना सांगितले.
 
000
Tags:

About The Author

Advertisement

Latest News

'माझ्यामुळेच थांबले भारत पाकिस्तानातील युद्ध' 'माझ्यामुळेच थांबले भारत पाकिस्तानातील युद्ध'
वॉशिंग्टन: वृत्तसंस्था  भारत आणि पाकिस्तान या अण्वस्त्रधारी राष्ट्रांमधील युद्ध आपल्यामुळेच थांबल्याचा दावा करीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 'तात्या' यांनी पुन्हा...
रिपब्लिकन पक्षातर्फे देशभर भारत जिंदाबाद यात्रा चे आयोजन
शहराचा सिमेंट काँक्रिटचा विकास होत असताना मंदिरासमोरील गोमाता पालिकेच्या कोंडवाड्यात
पुण्यात विविध ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी
'राहुल व सोनिया गांधी यांनी गुन्हेगारी कृत्यातून मिळवले 142 कोटी'
राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या सुनेने केली आत्महत्या
मोहम्मद युनूस यांची लवकरच हकालपट्टी?

Advt