'युट्युबर ज्योतीच्या विरोधात नाही कोणताही ठोस पुरावा'
हिसार पोलिसांचे प्राथमिक चौकशीनंतर स्पष्टीकरण
नवी दिल्ली: प्रतिनिधी
हेरगिरीचा आरोप असलेली youtuber ज्योती मल्होत्रा इथे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय, दहशतवादी संघटना यांच्याशी कोणतेही संबंध असल्याचे पुरावे अद्याप हाती आलेले नाहीत. ज्योती कडून पाकिस्तानला भारतीय संरक्षण दलांची अथवा प्रशासकीय यंत्रणांची संवेदनशील माहिती देण्यात आल्याचेही अद्याप निदर्शनास आलेले नाही, असे स्पष्टीकरण हिसार पोलिसांनी केले आहे.
ट्रॅव्हल विथ जो हे युट्युब चॅनेल चालवणारी ज्योती मल्होत्रा हिने पाकिस्तानला भारताबद्दल संवेदनशील माहिती दिल्याच्या संशयावरून तिला तिच्या साथीदारांसह अटक करण्यात आली आहे. तिने अनेकदा पाकिस्तानचा दौरा देखील केला आहे. पाकिस्तानच्या उच्चायक्त कार्यालयातील दानिश या पाकिस्तानी व्यक्तीने ज्योतीला हेरगिरी करण्यास प्रवृत्त केले, असे सांगितले जात आहे. मात्र, तिच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे अद्याप हाती आले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हिसार पोलिसांनी ज्योतीचे मोबाईल, ईमेल आयडी, समाज माध्यमांचे आयडी, बँक खाते या सर्वांची कसून चौकशी केली आहे. त्यामध्ये देखील कोणताही आक्षेपार्ह उल्लेख अद्याप आढळलेला नाही. ज्योती वापरत असलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी न्याय वैद्यक शाखेकडून केली जात आहे. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे त्याबद्दल माहिती देता येणार नाही, असे हिसार पोलिसांकडून सांगण्यात आले.
ज्योती हिच्या डायरीतील तीन पाने तपास यंत्रणांच्या हाती लागली असून त्यावरून काही गौप्यस्फोट होत असल्याचा दावा समाज माध्यमातून आणि काही बातम्या विषयक संकेतस्थळावरून केला जात आहे. मात्र त्यात तथ्य नसल्याचे हिसार पोलिसांनी सांगितले. ज्योती ही ची कोणतीही डायरेक्ट व त्यातील पाणी तपास यंत्रणांच्या हाती लागलेली नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
ज्योतीच्या विरोधातील कथित हेरगिरी प्रकरणाचा तपास पूर्णतः पारदर्शकतेने सुरू असल्याचा दावा हिसार पोलिसांनी केला आहे. अनेक केंद्रीय तपास यंत्रणांनी देखील वेळोवेळी ज्योतीची चौकशी केली आहे. सध्या ती पोलिसांच्या ताब्यात असून इतर कोणत्याही तपास यंत्रणेने तिचा ताबा मिळावा यासाठी मागणी केलेली नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.