सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलसचिव सुभाषचंद्र भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलसचिव सुभाषचंद्र भोसले यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. त्यांनी सन १९७९ ते १९८६ या कालावधीत विद्यापीठाचे कुलसचिव म्हणून जबाबदारी पार पाडली. तसेच सन १९९१ आणि सन १९९४ ते १९९५ मध्ये ही त्यांनी सदर पदाची धुरा सांभाळली होती. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी आणि प्र - कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू प्रा. डॉ. गोसावी आणि प्र - कुलगुरू प्रा. डॉ. काळकर यांनी स्वर्गीय भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
माजी कुलसचिव सुभाषचंद्र भोसले यांनी आपल्या कार्यकाळात विद्यापीठाच्या प्रशासकीय कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावली असून विद्यापीठाच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. त्यांनी अनेक प्रशासकीय सुधारणा केल्या. पारदर्शी व सक्षम प्रशासक अशी त्यांची ओळख होती.
000