लोकप्रिय अभिनेत्यांच्या टॉप १० मध्ये अक्षय कुमार नं. १

कार्तिक आर्यन शेवटच्या स्थानावर

'ऑरमॅक्स' संस्थेने जाहीर केलेल्या डिसेंबर २०२२ पर्यंतच्या लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत अक्षय कुमारने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यादीत शाहरुख खान दुसऱ्या क्रमांकावर तर सलमान खान तिसऱ्या क्रमांकावर आहे. या टॉप १० अभिनेत्यांच्या यादीत कार्तिक आर्यन शेवटच्या क्रमांकावर आहे.

लोकप्रिय अभिनेत्यांच्या टॉप १० मध्ये अक्षय कुमार नं. १

मुंबई: प्रतिनिधी 

'ऑरमॅक्स' संस्थेने जाहीर केलेल्या डिसेंबर २०२२ पर्यंतच्या लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत अक्षय कुमारने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यादीत शाहरुख खान दुसऱ्या क्रमांकावर तर सलमान खान तिसऱ्या क्रमांकावर आहे. या टॉप १० अभिनेत्यांच्या यादीत कार्तिक आर्यन शेवटच्या क्रमांकावर आहे. 

चित्रपट क्षेत्रातील तारे, तारकांचे चित्रपट आणि जाहिराती यांचा अभ्यास करून 'ऑरमॅक्स' त्यांची ब्रँड व्हॅल्यू निश्चित करते. या ब्रँड व्हॅल्यूच्या आधारावर त्यांची टॉप १० यादी प्रसिद्ध केली जाते. आताच्या या यादीत अक्षय कुमार, शाहरुख खान, सलमान खान यांच्या नंतर चौथ्या क्रमांकावर ऋतिक रोशन, पाचव्या क्रमांकावर रणबीर कपूर, सहाव्या क्रमांकावर अजय देवगण, सातव्या क्रमांकावर रणवीर सिंह, आठव्या क्रमांकावर वरुण धवन, नवव्या क्रमांकावर आमिर खान तर कार्तिक आर्यन १० व्य क्रमांकावर आहे. 

अक्षय कुमार याचे सन २०२२ मध्ये रक्षाबाबधं आणि रॅम सेतू हे दोन चित्रपट प्रसिद्ध झाले. मात्र, ते बॉक्स ऑफिसवर मोठी जादू दाखवू शकले नाहीत. या वर्षात मात्र त्याचे सेल्फी, omg २, बडे मियाँ छोटे मियाँ २ असे बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होत आहेत. शाहरुख खानचा मागच्या ४ वर्षात एकही चित्रपट आला नाही. मात्र, सध्या वादाच्या केंद्रस्थानी असलेला त्याचा पठान हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. सलमान खानच्या टायगर २ ची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

हे पण वाचा  सुट्टीचा उपयोग नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी करा : प्रा विजय नवले 

About The Author

Advertisement

Latest News

Advt