महाविकास आघाडी राज्यभरात घेणार एकत्रित सभा
कसब्याच्या निकालाने आशा पल्लवीत
On
राज्याच्या सर्व भागात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या घटक पक्षांचे नेते एकत्रित सभा घेणार आहेत. कसबा पोटनिवडणुकीत मिळवलेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आशा पल्लवीत झाल्या असून आगामी विधानसभा व महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पावले उचलायला आघाडीने सुरुवात केली आहे.
मुंबई: प्रतिनिधी
राज्याच्या सर्व भागात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या घटक पक्षांचे नेते एकत्रित सभा घेणार आहेत. कसबा पोटनिवडणुकीत मिळवलेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आशा पल्लवीत झाल्या असून आगामी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने पावले उचलायला आघाडीने सुरुवात केली आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक नुकतीच पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणूक एकत्रित लढविण्याच्या दृष्टीने वातावरण निर्मिती करण्यासाठी या बैठकीत कार्य आराखडा निश्चित करण्यात आला.
या आराखड्यानुसार तिन्ही पक्षांच्या एकत्रित सभा पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण या विभागांमध्ये आयोजित केल्या जाणार आहेत. तसेच तिन्ही पक्षांच्या जिल्हाप्रमुखांच्या एकत्रित बैठकाही आयोजित केल्या जाणार आहेत.
तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन नियोजनबद्ध रीतीने निवडणुका लढवल्यास भारतीय जनता पक्षाचा पराभव करता येणे शक्य आहे, असा विश्वास कसबा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीमध्ये निर्माण झाला आहे. आगामी निवडणुकांमध्ये तिन्ही घटक पक्षांच्या नेते कार्यकर्त्यांमध्ये समन्वय असावा, या दृष्टीने काही कार्यक्रमांची आखणी केली जात आहे.
Comment List