काँग्रेसची 'एकला चलो रे' धोरणाला तिलांजली
महाविकास आघाडीतूनच निवडणुका लढणार
On
अनेक वरिष्ठ नेत्यांच्या 'एकला चलो रे' या भूमिकेला मुरड घालत महाराष्ट्रातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका महाविकास आघाडीबरोबरच लढविण्याचा निर्णय काँग्रेस श्रेष्ठींनी घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाबत मात्र स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.
मुंबई: प्रतिनिधी

लोकसभेसह सर्व निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढवाव्या, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी वारंवार मांडली आहे. त्यामुळे अनेकदा महाविकास आघाडीत खटके उडण्याचा प्रसंग ही उद्भवला आहे. मात्र, आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक काँग्रेस महाविकास आघाडी मार्फतच लढवेल, असा निर्णय काँग्रेस श्रेष्ठींनी रायपूर येथे पार पडलेल्या अधिवेशनात घेतल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत मात्र वेगळा निर्णय घेण्यात आला आहे. त्या त्या ठिकाणची स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन निवडणूक स्वबळावर लढवायची की आघाडीमार्फत लढवायची याबाबतचा निर्णय स्थानिक नेत्यांशी चर्चा करून राज्य पातळीवरचे वरिष्ठ नेते घेतील, असे सांगण्यात आले आहे.
Comment List