'शोषित, वंचित आणि मध्यमवर्गावर लक्ष केंद्रित करा'

मोदी यांनी मंत्र्यांना दिला निवडणूक मंत्र

'शोषित, वंचित आणि मध्यमवर्गावर लक्ष केंद्रित करा'

नवी दिल्ली: प्रतिनिधी

यावर्षी काही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि आगामी वर्षाच्या सुरुवातीला होणारी सार्वत्रिक निवडणूक नजरेसमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्यांना निवडणूक मंत्र दिला आहे. त्यानुसार आगामी काळात शोषित, वंचित आणि मध्यमवर्गा वर लक्ष केंद्रित करा, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांना दिले आहेत.

आगामी काळात मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड, मिझोराम या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. तसेच आगामी वर्षाच्या सुरुवातीला सार्वत्रिक निवडणूक होणे अपेक्षित आहे. या निवडणुकांच्या दृष्टीने तयारीला लागण्याच्या सूचना मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिल्या.

येणाऱ्या काळात समाजातील शोषित वंचित घटक आणि मध्यमवर्गाला केंद्रभूत म्हणून उपक्रम करा. आपल्या मंत्रालयांच्या माध्यमातून या वर्गांना थेट लाभ पोहोचेल अशा योजना कार्यान्वित करा. या समाज घटकांच्या भावना समजून घेण्यासाठी बैठका, मेळावे अशा उपक्रमांचे आयोजन करा, अशा सूचना मोदी यांनी मंत्र्यांना दिल्या आहेत.

हे पण वाचा  युद्धबंदी भंग करून इस्राएलचा लेबनॉनवर हवाई हल्ला

पक्ष संघटनेच्या पातळीवरही आगामी निवडणुका लक्षात घेऊन नरेंद्र मोदी यांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्या अनुषंगाने मोदी यांनी नुकतीच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. मात्र, या बैठकीत काय चर्चा झाली याबाबत माध्यमांना माहिती देण्यात आली नाही.

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

'आम्ही बहिणींचे लाडके, त्यामुळे तुम्ही झाले दोडके'
'विधानसभा निवडणुकीतील महायुतीचा विजय डुप्लिकेट'
आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देण्यासाठी एलपीओ हॉलिडेजकडून ‘एक्सक्लुझिव्ह B2B ट्रॅव्हल एजंट्स मीटचं आयोजन!
'कबरीला कायदेशीर संरक्षण, तरी नाही महिमामंडण'
बार्टी, पुणे मार्फत अनुसुचित जातीच्या उमेदवारांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण
धर्मा प्रॅाडक्शन्स - एव्हीके पिक्चर्स घेऊन येत आहे ‘ये रे ये रे पैसा ३’ 
'लवकरच जाणार मंत्रिमंडळातील सहा सात मंत्र्यांचा बळी'
अजित पवारांनी काँग्रेसला पाडले मोठे खिंडार
श्री विघ्नहर साखर कारखान्यावर सत्यशील शेरकर यांची निर्विवाद सत्ता
कुसुमाग्रज स्मारकाला डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट