सलमान खानच्या फार्म हाऊसमध्ये घुसलेले दोघे जेरबंद

इतर राज्यातून बॉलीवूड सेलिब्रिटीज बघण्यासाठी आल्याची माहिती

सलमान खानच्या फार्म हाऊसमध्ये घुसलेले दोघे जेरबंद

मुंबई: प्रतिनिधी

सिने अभिनेता सलमान खान यांच्या पनवेल येथील अर्पिता फार्म हाऊसमध्ये अनाधिकाराने प्रवेश करणाऱ्या लोकांना सुरक्षा रक्षकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यांच्यावर अतिक्रमणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फार्म हाऊसच्या डाव्या बाजूला असलेल्या एका झाडावर चढून दोघेजण फार्म हाऊस मध्ये प्रवेश करत असल्याचे पाहिल्यानंतर आतील सुरक्षा रक्षकांनी त्यांना अटकाव केला. आत येण्याचे कारण विचारले असता ते कोणतेही उत्तर देऊ शकले नाहीत. सुरक्षा रक्षकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. 

घरात वाद झाल्यामुळे घरातून निघून बाहेर पडलोआणि बॉलीवूड मधील स्टार्सना पाहण्यासाठी मुंबईला आलो, असे या दोघांनी पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत सांगितले आहे. या दोघांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. 

हे पण वाचा  वसंत साळवे यांचा वाढदिवस महत्त्व पूर्ण व्याख्यानाने साजरा...

About The Author

Advertisement

Latest News

Advt