'खऱ्या कार्यकर्त्यांची जाणीव फक्त एकनाथ शिंदेंना'
कोकणापाठोपाठ विदर्भातही उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का
मुंबई: प्रतिनिधी
शिवसेना पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले राजन साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश करताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाला राज्याच्या दुसऱ्या टोकाला विदर्भात मोठा धक्का बसला आहे. चंद्रपूरचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करीत ते शिंदे गटात सामील झाले आहेत. शिंदे गटात सहभागी होतानाच त्यांनी उद्धव ठाकरे गटावर केलेल्या आरोपांमुळे मोठी खळबळ माजली आहे.
एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व झुगारले तेव्हापासून पक्षांमध्ये केवळ गटबाजी शिल्लक होती. त्याचवेळी आमची शिंदे यांच्याबरोबर जाण्याची इच्छा होती. मुख्यमंत्री असताना शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कधीही चंद्रपूरला भेट दिली नाही. सच्चा कार्यकर्त्यांना बळ दिले नाही. कार्यकर्त्यांच्या कष्टाची जाणीव केवळ एकनाथ शिंदे यांनाच आहे, असे जीवतोडे यांनी नमूद केले.
चंद्रपूरमध्ये सध्या शिवसेनेचा एकही आमदार नसला तरी देखील पुढच्या विधानसभा निवडणुकीत सहापैकी तीन आमदार पक्षाचे निवडून आणण्याचा आमचा निर्धार असेल, असेही ते म्हणाले.
Comment List