'कोणी कर्ज देता का कर्ज?'

पाकिस्तानच्या कथित पोस्टने जगभरात नाचक्की

'कोणी कर्ज देता का कर्ज?'

नवी दिल्ली: प्रतिनिधी 

'आमची आर्थिक परिस्थिती कमालीची बिकट आहे. त्यातच युद्ध आणि शेअर बाजार ढासळल्याने दुरवस्थेत अधिकच भर पडली आहे. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी आमच्या आंतरराष्ट्रीय भागीदार देशांना आवाहन आहे की त्यांनी आम्हाला अधिक कर्ज द्यावे. तणाव कमी करण्यासाठी आमच्या पाठीशी ठाम उभे राहावे,' अशा अर्थाची एक पोस्ट पाकिस्तानच्या अर्थ विभागाच्या X अकाऊंटवर प्रसिद्ध झाली आहे.

तिजोरीत खडखडाट असतानाही भारतात दहशतवादी कारवाया घडवण्याची आणि त्याची शिक्षा निमूटपणे भोगण्याऐवजी भारतावर युद्ध लादण्याची खुमखुमी असलेल्या पाकिस्तानची जगभरात नाचक्की झाली आहे. 

आपली फजिती झाली हे लक्षात येताच पाकिस्तानच्या अर्थ विभागाने एक केविलवाणा खुलासा केला आहे. ही आपली अधिकृत पोस्ट नाही. आपले X अकाऊंट हॅक करून त्याद्वारे ही पोस्ट करण्यात आल्याचा दावा पाकिस्तानचा अर्थ विभागाने केला आहे. 

हे पण वाचा  सुदर्शनचक्राने केले पाक हवाई हल्ल्यापासून भारताचे संरक्षण

वास्तविक पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला सावरणाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा दिवस आहे. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मदतीची याचना केली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे.. भारताने पाकिस्तानची शाहू बाजूने कोंडी करण्याची रणनीती आखली आहे. एकीकडे लष्करीदृष्ट्या पाकिस्तानला झोडपून काढत असतानाच पाकिस्तानला दिली जाणारी मदत कोणत्याही सकारात्मक कामात वापरली न जाता दहशतवाद्यांना पोसण्यासाठी वापरली जात असल्याचे  भारताने नाणेनिधीच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे पाकिस्तानला आपला दावा नाणेनिधीच्या गळी उतरवणे अधिक कठीण झाले आहे. 

About The Author

Advertisement

Latest News

Advt